उरण ( संगिता पवार ) जगभरात नैसर्गिकरित्या पर्यावरण संतुलन बिघडत चालले असल्याने दरवर्षी काही ना काहीतरी आपत्कालीन घटना घडत आहेत. जमिनीवरील हवा-पाणी मोठ्या प्रमाणात दुषित होत चालले आहे. त्यामुळे मानवाला प्रदूषण, अतिवृष्टी, हिमवृष्टी, भूसखलन, ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी माझी वसुंघरांतर्गत पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारीरायगड अलिबाग यांनी निर्देश दिले वरून नगराध्यक्षा सायली म्हात्रे व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृतीअभियान राबविण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. कोरोना चे सर्व नियमाचे पालन करण्यात आले.
सकाळी १० वाजता उरण नगरपरिषद येथून सायकल रॅली ला झेंडा नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी दाखवून रॅली ला सुरुवात झाली पुढे रामरतन शामियाना ,कामठा ,पालवी हॉस्पिटल .राजपाल नाका राघोबा मंदिर ,,जरीमरी मंदिर ,बाजार पेठ ,पोलीस स्टेशन ,मुस्लीम मोहल्ला ,वाणी आळी, वैष्णवी हॉटेल ,परत स्वामी विवेकानंद चौक ,एन आय हायस्कूल ,,नगरपरिषद येथे सांगता समारोप करण्यात आला .सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यांतआले .एन आय हायस्कूल वसेंट मेरीज हायस्कूल चेविद्यार्थी ,नागरिक ,अश्या 125 जन सहभागी झाले होते .
सहभागी झालेल्या पैकी लकी ड्रो काढण्यात आले त्यात साहिल परेश वैवडे या मुलास प्रोत्साहाना म्हणून सायकल देण्यात आली .
या वेळी व नगराध्यक्षा सायली म्हात्रे उपनगराध्क्ष जयविन कोळी ,नगरसेवक रवी भोईर , नगरसेवक कौशिक शाह ,नगरसेवक राजेश ठाकूर ,नगरसेविका यास्मिन गॅस , नगरसेविका जानव्ही पंडीत ,नगरसेविका स्नेहल कासारे ,नगरसेविका दमयंती म्हात्रे , नगरसेविका रजनी कोळी ,नगरसेविका आशा शेलार सर्व नगरसेवक ,नगरसेविका , दिपक दळी कुणाल शिसोदिया ,, स्वच्छतादूत ज्योत्सना घरत ,माय नॉलेज फौंडेशन चे नेहा राजेंद्र घरत ,प्रियंका नाखवा ,,उरण नगरपरिषद कर्मचारी आदींचे सहकार्य मिळाले .
नैसर्गिक आपत्तीच्या अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वाला वेळीच आवर घालण्यासाठी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आपण अनेक उपक्रम राबवीत आहोत . आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले .
Leave a Reply