ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आ.गोरंट्याल यांच्या नेतृत्वात शुक्रवारी आझाद गौरव यात्रा-शेख महेमुद

August 11, 202213:59 PM 13 0 0

जालना,(प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आझादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 2.30 वाजता जालना शहरात शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

जुना जालना गांधी चमन येथून आझादी गौरव यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार असून, सदरील यात्रा गांधीचमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड मंमादेवी मंदिर, मुथा बिल्डींग मार्गे महावीर चौक आणि शेवटी मामा चौक येथे पोहचेल. या यात्रेत जिल्हा प्रभारी तथा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार नामदेव पवार जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष आर.आर.खडके, भिमराव डोंगरे, कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे, राजेंद्र राख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या आझादी गौरव यात्रेत कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गणेश राऊत, विजय चौधरी, राम सावंत आदींनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *