सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत ललित कला केंद्र ( गुरुकुल ) पुणे येथे मनीषा गिराम बी. ए. भरतनाट्यम अंतिम वर्ष 2019-20 मध्ये शिकत होती. तिचा अंतिम वर्षाचा निकाल नुकताच पुणे विद्यापीठाने जाहीर केला असून या पदवी परीक्षेत तिने ग्रेड पॉइंट 7.12 मिळवत अंतिम श्रेणी बी + मिळवून यश संपादन केले आणि उत्तीर्ण झाली.
जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातून भरतनाट्यम मधून बी. ए.ची पदवी मिळवणारी ती पहिली मुलगी ठरली आहे. या यशाबद्दल तिने आपले आई – वडील हितचिंतक आणि मित्रपरिवार याचे शुभ आशीर्वाद पाठीशी असल्याचे सांगितले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती आता भरतनाट्यम मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असून त्यातच तिला करियर करण्याचा तिने निर्धार केला आहे. तिला तिच्या गुरू सुचेताताई भिडे – चापेकर यांचे मार्गदर्शन या पदवीसाठी मिळाले असून नृत्य विभाग प्रमुख श्री परिमल फडके आणि ललित कला केंद्राचे प्राचार्य श्री प्रवीण भोळे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले या यशाबद्दल तिने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
Leave a Reply