ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाबासाहेबांच्या समतेचा रथ सर्व घटकांपर्यंत न्यावा : अजिंक्य चांदणे

October 16, 202114:08 PM 52 0 0

जालना ( प्रतिनिधी) : विषमता असलेल्या देशास महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने एकञ जोडले. देशातील साडेसहा हजार जातींना बाबासाहेबांच्या समतेच्या रथास जोडण्यासाठी विद्रोही पँथर ने सर्व घटकांपर्यंत महामानवांचे समता वादी विचार पोहोचवावेत. असे आवाहन डि. पी. आय. चे महाराष्ट्र अध्यक्ष तथा फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ विचार धारेचे प्रचारक अजिंक्य चांदणे यांनी केले. विद्रोही पँथर सामाजिक विकास संघटनेचा प्रथम वर्धापनदिन धम्म चक्र अनुप्रवर्तन दिनी उत्साही वातावरणात संपन्न झाला गुरूवारी ( ता.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित व्याख्यान, प्रबोधन व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, युवा नेते अक्षय गोरंट्याल,सत्कार मुर्ती अॅड. बी. एम. साळवे, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, सुधाकर रत्नपारखे, सुदामराव सदाशिवे, अॅड. शिवाजी आदमाने, अशोक साबळे, कौशल्याबाई खरात, सुभाष गाडगे, सावित्रीबाई पगारे, सुरेश खंडाळे, शंकरराव क्षीरसागर, संघटनेचे संस्थापक कपिल खरात, सचिव संदीप साबळे,भास्कर बोर्डे, राजेश राऊत, मनोहर उघडे, अॅड. अशफाक पठाण, अॅड. राहुल हिवराळे, आलीम पटेल, राजू गवई, सगीर शेख , तेजराव शिंदे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजिंक्य चांदणे यांनी जातीय व्यवस्था, धर्मांध शक्ती, राजकीय गुलामगिरी या सोबतच बाबासाहेब हे केवळ दलित उध्दारक ही बिरुदावली खोडून काढण्यासाठी विद्रोह करावा लागेल. असे नमूद केले. ” जय भीम ” हे अभिवादनाचे वाक्य नसून कष्टकरी, शेतकरी, विद्रोह, बंड व समतेचा आवाज असल्याचे सांगून जागृती चा अग्नी अखंड तेवत ठेवण्यासाठी बोलणारे माणस जोडा, येत्या पाच वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात संघटन होईल. असा विश्वास अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केला. अक्षय गोरंट्याल यांनी महामानवांच्या कार्याची परतफेड करण्यासाठी प्रत्येक घरात उच्च शिक्षीत घडविण्याची जवाबदारी जेष्ठांनी स्विकारावी. अशी अपेक्षा व्यक्त केली. अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी जेष्ठांच्या सत्काराबद्दल समाधान व्यक्त करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ताकद घेऊन संघटना चालवा असे सांगितले. संस्थापक कपिल खरात यांनी सर्व समाजातील घटकांना संघटनेत जोडणार असून अडचणी व संकटात काळ, वेळ न पाहता उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.
प्रास्ताविकात प्रवक्ते राहुल उघडे यांनी वर्षभरातील संघटनेच्या कार्याविषयी माहिती दिली. आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल जेष्ठांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सुञसंचालन सचिव संदीप साबळे यांनी केले तर राहुल खरात यांनी आभार मानले. कडुबाई खरात यांनी बहारदार गायनाने प्रबोधन करत मंञमुग्ध केले.या वेळी अॅड. वैभव खरात, बापू साळवे, पप्पू चञे, भास्कर रत्नपारखे,दत्ता पवार, सिकंदर खान, लाला चौधरी, महेंद्र वाघमारे, सिद्धार्थ खरात, रवी जाधव, मिलिंद खरात, अरूण काजळे, भरत उगले, आकाश वाहुळ, विशाल तेझाड, गुंफाबाई वाघमारे, द्वारका म्हस्के, यांच्या सह महिला, तरूण, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिष्टांवर प्रहार करा : अर्जुन राव खोतकर
देशात दुही, द्वेष उफाळून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो मोडून काढतांनाच समाजातील अनिष्ट बाबींवर पँथरने प्रहार करावा. असा सल्ला शिवसेना नेते , माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिन, दलित, शोषीत, उपेक्षितांच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवले . त्यांच्या विचाराने काम करतांना दुसऱ्यांच्या आवडी- निवडी न पाहता संविधानाचा मुळ विचार गाभा स्मरणात ठेवून जेष्ठांच्या मार्गदर्शनाने कार्यरत रहा, असे सांगून समाज हिताच्या कामांचा सुगंध देश पातळीवर दरवळेल. असा विश्वास ही अर्जुन राव खोतकर यांनी व्यक्त केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *