ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व करारी आणि तेजस्वी होते –  भानुदास मगरे

December 22, 202113:52 PM 38 0 0

 नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत होते. ते अत्यंत स्वाभिमानी आणि विद्वान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व करारी आणि तेजस्वी होते’असे प्रतिपादन अॅड. भानुदास मगरे यांनी ‘बाबासाहेब पाहिलेला माणूस’ या कार्यक्रमात केले. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शाक्यपुत्र, भंते संघमित्र, भंते सुनंद, भंते सुदत्त, भंते सुयश, भंते शिलभद्र, भंते सुगत, भंते संघानंद, भंते संघदीप आणि नवदीक्षित श्रामणेर भिक्खू संघ, ज्योती बगाटे, भागोजी लोणे, रामराव चवणे, दिलीप पोहरे, प्रज्ञाधर ढवळे, निवृत्ती लोणे, चांदोजी थोरात, विजय मल्हारे, विजय कोकाटे यांची उपस्थिती होती.

ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे पौर्णिमोत्सव या कार्यक्रमात बाबासाहेब पाहिलेला माणूस या विषयावर बोलताना भागूजी लोणे यांनी बाबासाहेबांच्या सहवासात घालविलेला ऐतिहासिक काळ उलगडला. अतिरिक्त कोषागार अधिकारी ज्योती बगाटे म्हणाल्या की, पुस्तके माणसांचे मस्तक घडवतात. मी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्षात नाही पण पुस्तकांतून पाहिले आहे. अनुभवले आहे. वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक विहारात सुसज्ज ग्रंथालय असावे. आपल्याला जमेल तेव्हा विहारात किमान एक तरी नवा ग्रंथ दान द्यायला हवा. महिलांनाही यात मागे असू नये. त्यांनी आपले हक्क, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. महिलांचे निकोप संघटन धम्मचळवळीला पोषक ठरेल. यानंतर भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सदाचार हाच धम्म आहे. आपल्या दानावरच ही धम्मचळवळ उभी आहे, असे सांगून त्यांनी दान पारमितेचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धा काॅलनीतील बौद्ध उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला भोजनदान दिले. त्यानंतर विधीवत बोधीपुजा करण्यात आली. भिक्खू संघावर पुष्पवृष्टी करीत मंचावर पाचारण करण्यात आले. याचनेनंतर भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर त्रिरत्न वंदना गाथापठण संपन्न झाली. बाबासाहेब पाहिलेला माणूस या कार्यक्रमानंतर भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. अनेक ठिकाणांहून आलेल्या श्रद्धावान उपासकांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या विकासासाठी आर्थिक दान दिले. तसेच उपासक उपासिकांच्या भोजनानंतर मिनाक्षी वाघोळे, सुभाष लोकडे यांच्या संचाचा बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंते श्रद्धानंद यांनी केले. सूत्रसंचालन धम्मसेवक प्रज्ञाधर ढवळे यांनी तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले. यावेळी माळवटा, बोराळा, श्रद्धा काॅलनी, महादेव पिंपळगाव, किल्ले वडगाव, पिंपळगाव कोरका, राजनगर, प्रकाश नगर, रविराज नगर, राजेश नगर, गोपाळ कृष्ण नगर, महिपाल पिंपरी, सुगाव, उमा महेश काॅलनी आदी ठिकाणांहून बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *