ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खोपोलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची दुरावस्था

October 23, 202115:01 PM 44 0 0

खोपोली – अदिती पवार
खोपोलीच नाही तर खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले खोपोली नगरपरिषद चे मालकी हक्काचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य ग्रह ह्याची जी दुरवस्था झाली आहे, त्याची तात्काळ दुरुस्ती / सुधारणा करून नाट्य प्रयोग, सभा व इतर कामासाठी उपयोगात आन्याबाबत तसेच खोपोली नगरपरिषद चे आर्थिक उत्पन्न वाढवण्याबाबत दिनांक 24/09/21 रोजी निवेदन देऊन मा. मुख्याधिकारी श्री. अनुप दुरे साहेब ह्यांच्या बरोबर आम्ही खोपोलीकर माध्यमातून आम्ही चर्चा करून व त्या पुढे पुन्हा दि. 04/10/21, 11/10/21 स्मरणपत्र व चर्चा करून ही पुढे काय म्हणून सरते शेवटी मा. कोकण आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेब ह्यांना ह्या विषयाबरोबर इतर ही काही महत्त्वाचे विषय या संदर्भात पाठपुरवठा चालू केला आहे.


महाराष्ट्र शासन ह्यांनी मागेच ह्या संदर्भात नाट्य ग्रह व सिनेमा ग्रह चालु करण्याबाबत सकारणात्मक बोलून व पुढे या बाबत राज्य सरकारचे शासन परिपत्र आरोग्याचे कोरोना संबंधी जे आदेश / निर्देश आहेत त्याचे पालन करून चालू करण्याबाबत परवानगी देण्यात येईल या संदर्भात सविस्तर कार्य पद्धती तयार करण्याचे काम चालू आहे व ती लवकरच जाहीर करून नाट्य ग्रहे व चित्रपट ग्रहे चालू करण्याची परवानगी मिळेल त्यालाच अनुसरून आम्ही 1 महिना आधीच त्याच संदर्भात स्पष्ट पने इतर ही सर्व गोष्टींचा उल्लेख करून चर्चा करून ही आजूनही काडी मात्र काम खोपोली नगर परिषद च्या माध्यमातून त्यावर झाले नाही आहे.
खोपोली नगर परिषद ने थोडे थोडके नाही तर अंदाजे 9 करोड रू. खर्च करून अगदी मोक्याच्या जागी बांधलेले एकमेव नाट्य ग्रह ह्याची 5, 6 वर्षात काय दयनीय अवस्था झाली आहे हे आपण प्रत्यक्ष जाऊन बघा.
आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी नाट्य ग्रहे, सिनेमा ग्रहे चालू झाले पण आपल्या खोपोली, खालापूर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात असलेल्या नाट्य रसिकांचे काय..❓
याच बरोबर रायगड तडाखा न्युज चॅनेल चे न्युज ब्युरो चीफ श्री. राजशेखर परब तसेच नाट्य कलावंत श्री. उल्हासराव देशमुख, श्री. प्रवीण पुरी नाट्य रसिक श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी सुद्धा या बाबत दोन दिवस आधी निवेदन, चर्चा केली त्या बद्दल त्यांचे ही धन्यवाद / आभार …
खोपोलीच नाही तर खालापूर तालुक्यात असलेल्या नाट्य रसिकांन साठी हे नाट्य ग्रह चालू व्हावे व खोपोली नगर परिषद चे आर्थिक उत्पन्न वाढवावे हीच आम्हा सर्वांची इच्छा

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *