ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बालाजी इबितदार यांची निवड

May 2, 202215:22 PM 50 0 1

नांदेड – शहरात होणाऱ्या एकदिवसीय महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी येथील ओबीसी चळवळीतील अग्रणी बालाजी इबितदार यांची एकमताने निवड करण्यात आली. संमेलनाचे निमंत्रक म्हणून जी. पी. मिसाळे तर सहसंयोजकपदी प्रा. कैलास राठोड यांची निवड करण्यात आली. या संबंधीच्या नियुक्त्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून देण्यात आल्या. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, साहित्य संमेलन नियोजन समिती प्रमुख कोंडदेव हटकर, संयोजन समितीचे सदस्य अशोक मल्हारे यांची उपस्थिती होती.
बुध्द, फुले,शाहु, आंबेडकरी विचारांचे आजन्म प्रचारक तथा भीम गितांसाठी संपूर्ण जीवन झिजणारे,महान आंबेडकरी जलसाकार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या अनन्य साधारण योगदानाला अधोरेखित करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन नांदेडात करण्यात आले असून या ऐतिहासिक साहित्य संमेलनाच्या निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार जि.पी.मिसाळे यांची, स्वागताध्यक्षपदी बालाजी इबितदार, सहसंयोजकपदी प्रा. कैलास राठोड यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने संयोजन समितीच्या वतीने विसावा पॅलेस येथे सत्कार करण्यात आला. या एक दिवसीय साहित्य संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद, साहित्य कृतीना पुरस्कार, साहित्यिकांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्कार, एकपात्री, आंबेडकरी जलसा, चित्रप्रदर्शनी आदी भरगच्च कार्यक्रम असून यात महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शताब्दी वर्षानिमित्त वामनदादा यांच्या जीवनकार्यावर महाराष्ट्रातील शंभर कविंच्या कवितांचा कविता संग्रह, आणि माझ्या जीवनाचं गाणं या दादांच्या नव्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे
येथील सत्यशोधक फाउंडेशन आणि मानव विकास सेवाभावी संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून एन.डी.गवळे, एन.टी.पंडीत, प्रभू ढवळे, डॉ. रामचंद्र वनंजे, रमेश कसबे, अशोक मल्हारे, ज्ञानोबा दुधमल,एम.एस.गव्हाणे, महेंद्र नरवाडे, अनंत ढवळे, नितीन एंगडे, संजय जाधव, पी.के. खानापूरकर, एम.डी.जोंधळे,आर .पी.झगडे, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, बाबुराव पाईकराव, रुपाली वागरे वैद्य, शंकर गच्चे, कैलास धुतराज, रणजीत गोणारकर आदी परिश्रम घेत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *