जालना : तळणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी सतत गैरहजर राहात असल्यामुळे या परिसरातील शेतकर्यांना पीक कर्जापासून वंचित रहावे ैैैअसून सदर बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना समज देण्यात यावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मराठा महासंघाचे मंठा तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांना श्री. देशमुख यांनी निवेदन दिले असून सदर निवेदनात म्हटले आहे की, मंठा तालुक्यातील तळणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा अधिकारी माहे एप्रिल २०२१ पासून सतत गैरहजर आहेत या कारणामुळे बँकेतील आर्थिक व्यवहार सक्षम अधिकारी नसल्याकारणामुळे खोळंबले आहेत. शेतकरी तसेच ग्रामस्थांना अनेक अडचणीना तोड दयावे लागत आहे. आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार वेळेवर होत नाही. पीक पेरणीला वेग आलेला असतांनाच शेतकरी व ग्रामस्थांना पैसे जमा करतांना व काढताना अनेक अडचणीना समस्यांना तोड दयावे आहे. बँकेतील कर्मचारी व अधिकारी हे शेतकरी, ग्राहकासोबत उदध्दटपणे वागून अरेरावीची भाषा करतात,
बँकेतील शाखा व्यवस्थापक सतत गैरहजर राहत असल्यामुळे पीक कर्ज योजनाच्या कामाला खीळ बसलेली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जासाठी उद्दिष्ट पुर्ण होताना दिसत नाही. यामुळे शेतकर्यांमध्ये असतोषाची व संतापाची लाट पसरली आहे. यावर तोडगा न काढल्यास शेतकरी वर्गामध्ये असतोष निर्माण होऊ शकतो. शेतकरीवर्ग हवालदिल झालेला आहे. बी-बीयाणे, शेती औजारे, खते घेण्यासाठी शेतकर्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सदरील प्रकरणाची आपण जातीने लक्ष घालुन शेतकरी पीक कर्ज योजना सुरू करावी तसेच तळणी गावाचा विस्तार लक्षात घेऊन गावात महाराष्ट्र ग्रामीण बँके सोबत राष्ट्रीयकृत बँकेची शाखा लवकरात लवकर सुरू करावी, जेणेकरून शेतकरी व ग्रामस्थाना आर्थिक व्यवहार सुलभ होतील, अशी मागणीही श्री. देशमुख यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
Leave a Reply