ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण साहित्यिक लेखक बाळासाहेब कांबळे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने सन्मानित

June 16, 202212:06 PM 28 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : सातारा जिल्ह्यातील मायणी येथील लेखक बाळासाहेब कांबळे यांना उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी वाड्.मय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांचे हस्ते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,मसाप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरुके, डॉ.रामप्रसाद लखोरीया, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर,
लेखक अंबादास केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यांच्या बहुचर्चित’भिनवाडा’या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यापूर्वी श्री. कांबळे यांनी असे घडले महापुरुष, म.जोतीराव फुले, रमाई चरित्र अशा पुस्तकांचे लेखन केले असून रमाई चरित्र हे कन्नड भाषेत अनुवादित झाले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *