ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कष्टाचा पैसा लावूनही बॅंक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांनाच चोर ठरवित असल्याचा प्रकार सुरू

October 25, 202113:45 PM 63 0 0

खोपोली (अदिती पवार ):– एचडीएफसी व आयसीआयसीआय सारख्या खाजगी बँक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असतात. तर दुसरीकडे आम्ही आपल्या कष्टाचा पैसा लावूनही  बॅंक ऑफ महाराष्ट्र  ग्राहकांनाच चोर ठरवित असल्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. खोपोली येथील ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ शाखेत सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. कर्मचाऱ्यांसह ग्राहकांना सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘मोगलाई’चा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या ग्राहकांसोबतही वरिष्ठ अधिकारी हमरी-तुमरीची भाषा करीत असल्याने अनेक उद्योजक  बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील आपली खाती बंद करून दुसऱ्या बॅंकेत खाते उघडण्याच्या मनस्थितीत ग्राहक पोहचले असल्याचे समजते.वरीष्ठ पदांवर चार-पाच महिन्यांपूर्वी रूजू झालेल्या वरीष्ठ अधिकाऱ्याकडून खोपोलीतील  बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा बंद करण्याची सुपारी घेतल्यासारखे कामकाज सध्या सुरू आहे.

दररोज लाखो रूपयांची देवाण-घेवाण करणाऱ्या ग्राहकांना ‘त्या’ भेटत नाहीत. त्याचप्रमाणे ग्राहकांना हमरीतुमरी करीत असतात. ग्राहकांच्या समस्या समजून घेण्यापेक्षा आपल्याच तंद्रीत असतात. दररोज या शाखेत ग्राहकांसोबत काही भांडण होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एवढेच नव्हे खोपोलीतील एका लोकप्रतिनिधीला देखील तुच्छ वागणूक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. अशा वागणुकीमुळे खोपोली येथील ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ शाखेतील खाती बंद करून दुसऱ्या बॅंकेत खाते उघडण्याच्या मनस्थितीत पोहचले असल्याचे समजते एका कर्मचाऱ्याला तडकाफडकी कामावरून काढले? :- ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ ही भारतात नसून मोगलांच्या ताब्यात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकत्याच रूजू झालेल्या वरीष्ठ अधिकाऱ्याकडून ग्राहकांना अतिशय हिन दर्जाची वागणूक दिली जात आहे. ‘आमचा पैसा आणि आम्हीच चोर’, अशी जाणीव बॅंकेतील ग्राहकांना होत आहे. दरम्यान, दुसरीकडे हुकुमशहा अधिकाऱ्यांकडून एका कर्मचाऱ्याला तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दहा वर्षापूर्वी कामावर लागलेल्या एका कर्मचाऱ्याला कोणतीच नोटीस न देता, सोमवारपासून कामावर येवू नकोस, असा आदेश देवून कामावरून काढून टाकले. सदर तरूणाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. शंभर रूपये दिवसाने दहा वर्षापूर्वी कामावर लागलेल्या युवकाचे मे महिन्यात लग्न झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोकरीवरून काढून टाकल्याने सदर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *