ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षण आणि खेळ मूलतत्वे

July 25, 202118:29 PM 104 0 0

आज ऑलिम्पिक स्पर्धे चा पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी चांगल्या प्रकारे खेळ दाखवून खेळाला सुरवात केली आणि पहिल्याच दिवशी मिराबाई चानूला हिने रोप्य पदक( Silver Medal) पटकाऊन दिवसाची सुरुवात यशस्वी सुरुवात केली व तिच्या या यशाबद्दल तिचे नांदेड जिल्हा सेपक टाकराव संघटनेच्या वतीने तसेच खेळाडू पालक यांच्या कडून मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तसेच आचर्ररी (धनुर्विद्या) स्पर्धेत डबल इव्हेंट मध्ये भारतीय संघ कॉटर फाईनल मध्ये प्रवेश केला व भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंड ला प्रथम सामन्यात हरवून आपली चुणूक दाखवून दिली आणि जुदो स्पर्धे च्या सामन्यात सुशीला देवी हिने उत्कृष्ठ प्रदर्शन करत निसटता प्रभाव स्वीकारावा लागला एकंदरीत आज चा दिवस भारतीयांसाठी चांगला गेला.आणि *विषेश बाब म्हणजे या वर्षी च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या जिल्ह्याची मुलगी भाग्यश्री जाधव हिचा सुध्दा सहभाग आहे ती गोळा फेक(shot-Put) या इव्हेंट मध्ये भाग घेत आहे* इश्वर चरणी प्रार्थना करतो की भारतातील विविध राज्यातील व जिल्ह्यातील खेळाडू या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन विजयी होत आहे व त्या जिल्ह्यात त्यांचा आणि त्यांच्या शहराचा जिल्ह्यचा राज्याचा देशात व जगात जय जयकार होत आहे अशीच संधी आपल्या जिल्ह्याला सुद्धा चालून आली आहे आणि आलेल्या संधीचे भाग्यश्री ने सोने करावे हीच इच्छा ईश्वरा समोर ठेवतो.
मागील दोन वर्षा आदी आशाच प्रकारे एशियन गेम्स मध्ये भारतीय सेपक टाकराव संघाने कांस्य पदक

( Bronze Medal) पटकाविले होते या सर्व गोष्टीतुन इतकंच मत व्यक्त करतो की आपल्या नांदेड जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मुलांना त्यांचा खेळ अर्ध्यावर सोडून देऊ नका जेणे करून आपल्या मुलांमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू होणारा होणार नाही मागील 15 वर्षांपासून खूप खेळाडू आदरणीय गुरुवर्य प्रवीण कुपटीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी घडवीत आहोत पण खेळाडू जेंव्हा त्याचा खेळ चांगल्या प्रकारे शिकल्या नंतर विद्यार्थी व पालक आपल्या पाल्याचा खेळ बंध करत असतो तेंव्हा त्याच्यावर जो प्रशिक्षक मेहनत घेतो त्याला एकादा खेळाडू खेळ खेळून हरल्यावर जेवढा हताश किंवा निराश किंवा दुःख होत नाही तेवढा जेंव्हा खेळाडू आपला खेळ सोडतो तेंव्हा तो निराश आणि हताश व दुःखी होत असतो आणि त्या प्रशिक्षकाला आजुन आपली सुरवात शून्यातून सुरवात करावी लागते सर्व खेळाडूंना व पालकांना मी आजच्या या लेखातून एवढेच सांगू इच्छितो की मागील दोन वर्षांपासून आपण संपुर्ण जग ज्या महामारीशी लढत आहोत त्यातून आपण सुखरूप बाहेर येण्यासाठी आपल्याला व आपल्या पाल्याला मैदानावर येणे आवश्यक आहे दोन तासात त्याच मैदानावर भविष्यातील एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू तिथं घडू शकतो नाही घडला तरी एक शारीरिक, मानसिक व निरोगी खेळाडू,विद्यार्थी, व आपला पाल्य आपण तिथं घडवू शकतो याकरता आपल्या पाल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हीच आपणास विनंती करतो व माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद
आपलाच
रवीकुमार बकवाड
सचिव
मेजर ध्यानचंद क्रीडा युवक मंडळ व व्यायाम शाळा ,नांदेड
प्रशिक्षक नांदेड सेपक टाकराव असोसिएशन

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *