ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गंगास्नान केल्याने राम प्रसन्न होईलच असे नाही : भाईसाहेब गुरुप्रीत सिंग

October 20, 202112:54 PM 44 0 0

जालना : रामाला प्रसन्न करुन घेण्यासाठी बरेच जण गंगास्नान करतात. त्यातले काही जण दिखावाही करतात. परंतू रामाला प्रसन्न करायचे असेल तर केवळ गंगास्नान केल्याने काहीही होत नाही. बेडूक दररोजच पाण्यात राहतो, मग त्याने काय त्याला राम प्रसन्न होतात काय? तुम्ही कितीही तिर्थाला जा, त्याने प्रभू खुश होतात काय? प्रभूंना तर निस्सीम भक्ती हवी आहे, तीच आपण केली पाहिजे, असा हितोपदेश भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांनी दिला. अमृतवेला सत्संग ट्रस्ट आणि पुज्य सिंधी पंचायत जालना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या सिंधी पंचायतमध्ये अमृतवेला कीर्तन दरबारचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.


भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांनी जल कै मजनि गति होवै नित नित मेंडुक नार्वाहे ॥ या पक्तींवर निरुपन करतांना ते म्हणाले की, आपलं मनं खूप मळालेलं आहे, त्याला साफ करण्याची गरज निर्माण झालेली असून ती प्रत्येकानेच पूर्ण केली पाहिजे. अनेक लोक तीर्थस्नान करतात. त्यातले बहुतेक जण तर दिखाव्यासाठी तीर्थस्नान करण्यासाठी जातात. परंतू त्याने काय होणार? राम सगळं काही जाणतात. कोण- कसं स्नान करतात. किती जण दिखावा करतात, हेही प्रभू जाणतात. शुध्द पाण्यात स्नान केल्याने मन शुध्द होईलच असे काही नाही. बेडूक तर दररोजच पाण्यात राहतात, मग त्यांना मनुष्याचा जन्म का मिळत नाही? सर्वोत्तम तिर्थात स्नान केल्याने पापं धुवून जातात, या भ्रमात राहू नका, असा उपदेश करुन भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांनी
पूजहु रामु एकु ही देवा ॥
साचा नावणु गुर की सेवा |
जल कै मजनि जे गति
होवै नित नित मेंडुक नावहि |
जैसे मेंडूक तैसे ओइ,
नर फिरि फिरि जोनी ॥
या गुरु चरणांचा आधार घेत आपल्या ओजस्वी वाणीतून तीर्थ स्नानाचे महत्व विषद करुन सांगितले. ते म्हणाले की, गुरुंची सेवा करण्यासाठी गुरुंच्या चरणावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे नाम जपत नाहीत, ते बावळे आहेत. तुम्हाला खरोखरच तीर्थ स्नान करायचे असेल तर गुरुंची सेवा करायला लागा. गुरुंना कशाचीही कमी नाही. आम्ही सेवा करतो परंतू त्या सेवेत कृतज्ञपणा नसतो. म्हणून गुरु आपल्याला प्रसन्न होत नाही. तीर्थस्नान करायचे असेल ते मनोभावे करा, असेही शेवटी भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांनी शेवटी सांगितले. यावेळी समाजातील अनेक स्त्री- पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *