ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सी बर्ड विशेष मुलांची शाळा ( स्वीकार ) ने बनविल्या सुंदर पणत्या

October 22, 202113:53 PM 13 0 0

उरण (संगीता पवार ) दिवाळी म्हणजे पणत्या ,आकाश कंदील आणि फटाके या सर्व सणाला लागतातच.दिवाळी म्हणजे आधाराकडून प्रकाशा कडे नेणारा सण होय . दिवाळी सणाला थोडेच दिवस राहिले आहेत .दिवाळीत पणत्यांना विशेष महत्व असते .या सणांना लागणाऱ्या पणत्या उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान तर्फे चालवीत असलेल्या सी .बर्ड विशेष मुलांची शाळा ( स्वीकार ) उरण नगरपरिषद चे स्वातंत्र्यवीर दिवंगत दत्ता रहाळकर मैदान ,बोरी येथे दर वर्षा प्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी सुंदर पणत्या बनविल्या आहेत.

सुंदर पणत्या २० रुपये ते २०० रुपये दोन नग ,त्याच प्रमाणे ८० रुपये ते २०० रुपये या दराने सुंदर व आकर्षक पणत्या या दराने विकल्या जातात . शाळेतील विद्यार्थी दर वर्षी राख्या ,पणत्या ,तोरण ,पाकीट ,आहेर पाकीट ,कागदी पिशव्या आदी बनवीत आहेत .त्य वस्तूंना उरण शहरातील सेंट मेरीज शाळा यु ,ई एस ,शाळा ,श्रीमती भागुबाई चांगु विद्यालय ,नवदुर्गा नवरात्र मंडळ बोरी ,तसेच डी .पी .वर्ड कंपनी यांची मागणी असते .उरण तालुक्यातील समाजसेवक , दान शूर व्यक्तींचे सहकार्य मिळते.असेसौ .माधुरी उपाध्ये यांनी सांगितले..१ सप्टेंबर १९९९ रोजी बेलापूर येतील श्रीमती शिरीष पुजारी यांनी उरण येथे अवघ्या ५ मुलां पासून शाळा सुरु करण्यात आली आज या शाळेत ४० विद्यार्थी शिकत आहेत .शाळेत एकूण चार वर्ग असून ३ शिक्षक ,५ कर्मचारी आहेत ,शाळेच्या पर्यवेक्षक सौ .माधुरी उपाध्येयांच्या मार्गदर्शना खाली शिक्षक वर्ग मुलांच्या कालागुंनाना वाव देऊन चांगल्या प्रकारे शिकवीत आहेत .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *