ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नाशकात पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार

September 28, 202115:12 PM 71 0 0

नाशिक : ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक नाशिकमध्ये समोर आल आहे. पार्लरमध्ये पूजा करत असताना दुकानात शिरुन आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून व्यावसायिक महिलेवर बलात्कार केला. नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना संशयित आरोपी दुकानात घुसला. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.


खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर
हिंमत करुन महिलेने अंबड पोलिसात तक्रार दाखल केली. खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटल्यानंतर संशयित फरार झाला होता. त्याचा शोध सुरु असतानाच त्याने बलात्काराचा गुन्हा केला . फरार संशयिताचा शोध सुरु आहे.
पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली आहेत.
नागपुरात 24 वर्षीय युवतीवर बलात्कार
दुसरीकडे, 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
काय आहे प्रकरण?
आरोपी सोहेल वहाब खान आहे आणि पीडित तरुणी जवळपास गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सोहेलने 2016 पासून वारंवार आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, जेव्हा पीडित तरुणी गर्भवती झाली, तेव्हा आरोपीने तिला यूट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:चा गर्भपात करण्यास सांगितले. कुटुंब घरात नसताना तिने घरीच नाळ कापून गर्भपात केल्याची माहिती आहे.
स्मशानभूमीत गर्भाचे दफन
अहवालात म्हटले आहे की, सोहेलने ताज नगर स्मशानभूमीत गर्भाचे दफन केले. काही आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र गेल्या आठवड्यात महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेच्या कुटुंबाला असे वाटते, की सोहेलने तिला खोटी आश्वासने देऊन फसवले, कारण तो आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे, तर त्याची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपीचे दोन वेळा लग्न
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोहेल खान हा ड्रायव्हर असून यापूर्वी दोनदा त्याचे लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते आणि त्याला एक मुलगाही आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी खानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. तर फॉरेन्सिक टीमने गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो सफल होऊ शकला नाही.
डीएनए नमुन्यांसाठी आम्ही गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण दुर्दैवाने त्याचा शोध लागला नाही. आम्ही अजूनही गर्भाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलीस अधिकारी म्हणाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *