जालना (प्रतिनिधी) – लिडर होणे सोपे नाही मात्र ज्याच्या जवळ नम्रता, शालिनता, दुसर्याच्या चुका न काढता त्याला दुरुस्त कसे करता येइल, सहकार्याने केलेल्या कामाबद्दल प्रोत्साहन आणि सांघीक काम करताना उच्च कनिष्ठ हा भेद न ठेवणे या सारख्या गोष्टी आत्मसात केल्यास अवघड हि नाही आणि यातुनच तुम्ही उत्तम नेतृत्व करु शकता असे प्रतिपादन सरस्वती भुवन प्रशाला समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ उद्योजक सुनिलभाई रायठठ्ठा यांनी केले. ते शिक्षक दिनानिमत्त आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होते.
जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या वतिने भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. आज बुधवार (दि. 8 रोजी) संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष तथा जेष्ठ उद्योजक सुनिलभाई रायठठ्ठा, प्रमुख पाहुणे म्हणुन सा. चकमक चे कार्यकारी संपादक कैलास फुलारी, प्राचार्य पी.जी.बोराडे, उप प्राचार्य रत्नाकर वाडेकर, प्रभारी पर्यवेक्षक सुरेश नदं वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. लक्ष्मण गोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांनी श्री सरस्वती प्रतिमा अणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला सुरेश नदं, रत्नाकर लांडगे आणि व श्रीमती पाटोळे यांनी शिक्षकांच्या वतिने आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे पत्रकार कैलास फुलारी व प्राचार्य श्री.पी.जी.बोराडे सरांनी शाळेच्या शिक्षकांच्या कार्या बद्धल कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील राायठठ्ठा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांच्या कार्याबद्दल कौतुक करतांना आपल्या कार्याचे मूल्यमापन आपण करत असलेल्या कामाच्या परिणामावरून होत असते. उत्तम नेतृत्व किंवा समाजमान्य लिडर बनण्यासाठी कोणते गुण अंगी असले पाहिजे याचे विश्लेशन त्यांनी करत असे सांगत अनेक उदाहरणे त्यांनी या वेळी दिले. सांघीक काम करताना आपल्या सहकार्यांना समजुन घेणे, बदल हवा तर तो सर्व संमतीने आणि विधायक पद्धतीने करावा असे ते म्हणाले. काम करत असताना अंगी नम्रता, शालिनता, दुसर्याच्या चुका न काढता त्याला दुरुस्त कसे करता येइल, सहकार्याने केलेल्या कामाबद्दल प्रोत्साहन देणे किंवा त्याच्या कडुण जास्तित जास्त चांगल्या प्रकारे कसे काम करुण घेता येईल याची कला अंगी असणे आणि सांघीक काम करताना उच्च कनिष्ठ हा भेद न ठेवता प्रत्येक यश अपयश हे एकमेकांना शेअर करावे यातुन येणार्या अनुभवातुन पुढे जावे या सारख्या गोष्टी ह्या संस्था, कंपणी किंवा परिवाराच्या विकासाला पुरक ठरत असल्याचे प्रतिपादन सुनिलभाई रायठठ्ठा यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका सौ. विद्या दाबके यांनी तर आभार उपप्राचार्य रत्नाकर वाडेकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचार्यांची उपस्थित होती.
Leave a Reply