ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बेलवाडी सारडे ता. उरण येथील कुटुंबाचे घर सोसाट्याच्या वारा आणि मुसळ धार पावसाने कोसळले; घरात कोणी नसल्याने जीवित हानी टळली

July 22, 202112:41 PM 25 0 0

उरण प्रतींनिधी  ( संगीता ढेरे) : सोमवार दिनांक 19/07/2021 रोजी दुपारच्या वेळेस चंदा नारायण वाघमारे यांचे राहते घर ( झोपडी) सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पावसामुळे कोलमडून पडले. सुदैवाने घरातील दोन्ही माणसे मच्छी पकडण्यासाठी खाडी वर गेली असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घर कोसळताना प्रचंड मोठा आवाज झाला तेंव्हा बाजूच्या घरात राहणारे कातकरी बांधव धावून गेले. ते चित्र पाहिल्यावर त्यांना शॉक च बसला. ज्या घरात ते कुटुंब गेली अनेक वर्ष राहत होते ते घर पूर्ण पने उध्वस्त झाले होते.

चंदा आणि तिचा नवरा घरी आल्यावर त्यांनी टाहो फोडला. पण हिम्मत न हरता त्यांनी त्या घरासाठी वापरलेले सांमनातील जे काही चांगले होते ती कौले बाजूला करून ठेवली. आज पाऊस जोरदार असल्यामुळे आजच्या दिवस शेजाऱ्यांकडे वास्तव्य करून, उद्या पासून पुन्हा नव्याने घर बांधायचा निर्धार केला. मान तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी संबंधित तलाठ्याला आणि गट विकास अधिकारी निलम गाडे मॅडम यांनी संबंधित ग्रामसेविका यांना आदेश देवून तातडीने पंचनामा करून शासनाकडून जे शक्य असेल ती मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. आपल्या घरी एक दिवस पाणी आले नाही तर आपण जीवाचा आकांड तांडव करतो, पण मी आज आदिवासी बांधवांन कडून अजून एक गोष्ट शिकलोत की कितीही मोठे संकट आले तरी त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करायचे. सदर मेसेज सर्व ग्रुप वर पोहोचल्यावर सर्व कडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन डाउर यांनी बेल वाडी वरील सर्व कुटुंबांना धान्याचे पोते दिले आहे. तसेच उरण सामाजिक संस्था महिला विभाग अध्यक्षा सौ.सीमा अनंत घरत.यांनी महिन्या भराचा किराणा सामान दिला आहे, प्रमोद ठाकुर यांनी पत्र्याचे घर बांधून , त्या मधे बाथरूम,टाॅयलेट याची उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सांगितले आहे .उरण सामाजिक संस्था चे उपाध्यक्ष प्रा राजेंद्र मढवी अणि सर चिटणीस संतोष पवार यांनी तातडीने मदतकार्य सुरू केलेले आहे . संदिप पाटील कामगार नेते बोकडवीरा यांनी संसाला लागणारी भांडी देण्याचे कबुल केले आहे.या प्रसंगी शेतकरी कामगार पक्ष चे सहचिटणीस यशवंत ठाकुर ,व हर्ष संतोष पवार ही उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *