ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लाभदायी केळीचे पान

December 18, 202113:41 PM 130 0 0

काळाच्या ओघात लुप्त होत असलेली आमच्या हिंदू संस्कृतील एक परंपरा म्हणजे केळीच्या पानावर जेवणे. आजही भारतात काही ठिकाणी प्रामुख्याने दक्षिण भारतात ही परंपरा घरी व अगदी काही उपहारगृहांमध्येही दिसून येते. सणासुदीला नैवेद्यासाठी केळीच्या पानाचा वापर सगळीकडेच आपल्याला दिसून येतो. आपल्या हिंदू धर्मातील या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांमागे आपल्याला काहीतरी शास्त्रीय विवेचन नेहमीच दिसून येते. तसेच केळीच्या पानावर जेवणे यामागेही आयुर्वेदिक महत्त्व आहे. केळीच्या पानामध्ये ‘प्लॅन्ट बेस्ड कंपाऊंड’ अधिक प्रमाणात असतात.

केळीच्या पानात ‘एपिगॅलोकेटॅचिन गॅलेट’ ज्याला ‘ईजीसीजी’ हे घटक आढळून येतात, हे घटक ग्रीन टी मध्येही आढळून येतात. यातून आपल्याला नैसर्गिक अँटिऑक्सिडंट मिळतात जे व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे. केळीच्या पानावर गरम पदार्थ खाल्ल्याने त्यातील पौष्टिक घटक व्यक्तीला मिळतात तसेच हे जंतू वर्धक असल्यामुळे आरोग्यास अधिक लाभदायक आहे. केळीच्या पानावर असणाऱ्या पापुद्रयामुळे जेवणाची चव वाढते. आयुर्वेदात सांगितले आहे की रोज केळीच्या पानावर जेवल्याने त्वचारोग, बद्धकोष्टता यासारखे आजार होत नाही व आरोग्य चांगले राहते, तसेच केळीचे पान हे पर्यावरण पूरक असल्याने ते अधिक लाभदायी आहे. हे सर्व पाहिले तर आपल्या संस्कृती व धार्मिक कृतीमागील वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात येतो व आरोग्यदायी गोष्टींची सांगड धार्मिकतेशी जोडून मानवाचे कल्याण जोपासणारी आमची संस्कृती किती महान आहे हे लक्षात येते.

डॉ० पी. एस. महाजन
संभाजीनगर

Categories: आरोग्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *