ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोविड -19 मुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाद्वारे विविध योजनांचा लाभ

March 19, 202213:54 PM 33 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : कोविड -19 मुळे पालक गमावलेल्या बालकांकरीता महिला व बाल विकास विभागाद्वारे विविध योजनेचा लाभ दिला जातो. त्या अंतर्गत पालक गमावलेल्या बालकाच्या आर्थिक मदतीकरीता बाल न्याय निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीतील सदस्य सचिव, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकउे आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.
जिल्हा कृती दलामार्फत अर्जांची तपासणी करुन गरजू बालकांना लाभ दिला जाणार आहे. बाल न्याय निधीद्वारे कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालकांना शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक साहित्यसाठी मदत केली जाणार आहे. त्यामुळे गरजू बालकांनी त्वरीत अर्ज दाखल करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्हि. ए. तावरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, 2 रा मजला एस.टीस्टॅड जवळ,सातारा दुरध्वनी क. 02162 -237353 तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *