कोरफड हे नाव आपल्या सगळयांना परिचित आहे. ही एक औषधी वनस्पती म्हणुन सुपरिचित आहे. चमत्कारीक रोपटं म्हणुनही याला ओळख आहे, बाजारात कोरफड पासुन बनलेल्या त्वचेसंबधी बरेच उत्पादनं अगदी सहज उपलब्ध आहेत. तसच केसांना देखील कोरफडीने बरेच लाभ होतात. तसं बघीतलं तर प्राचीन काळापासुन कोरफडीचा उपयोग होत असल्याचं आपल्याला दिसतं, इतकचं काय तर इजिप्त मधील लोक कोरफडीला अमरत्वाचं झाड देखील संबोधायचे.
कोरफडीबद्दल आपल्याला बरीच माहीती आहे पण आपल्याला हे माहीत आहे का की सौंदर्याकरता कोरफडीचा उपयोग कशाप्रकारे केला जातो? इथे कोरफडी पासुन निर्मित बरीचशी सौंदर्यवृध्दीकरता फेस पॅक दिले आहेत, कमीत कमी खर्चात घरबसल्या याचा उपयोग करून आपण आपल्या सौंदर्यात वाढ करू शकतो.
♦ कोरफडीचे फायदे ♦
1) मुलायम त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक – काकडीचा रस, कोरफड जेल, दही, गुलाब जल, आणि तीळ तेल याचे मिश्रण बनवावे, या मिश्रणाला आपल्या चेह-यासोबत मानेवर लावावे, 10 मिनीटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुउन टाकावा या मिश्रणाने त्वचा मुलायम तर होतेच सोबत चेहे-यावर तजेला येतो.
२) त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक
2 चमचे कोरफड जेल – 5 ते 6 बिनबियांचे खजुर, काकडीचे तुकडे, आणि लिंबाचा रस घेऊन एकत्र मिसळावा. या मिश्रणाला एका बाॅटल मध्ये देखील तयार करून ठेवले जाऊ शकतं. रोज या मिश्रणाने चेहरा आणि मानेला मसाज करावा, 30 मिनीटे तसेच ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवावा.
3) तेलकट त्वचेकरता कोरफडचा फेस पॅक – कोरफडीचे पानं उकळुन 2 चमचे मधासोबत मिश्रण तयार करावं. हे मिश्रण चेह-याला तसेच गळयाला लावुन 20 मिनीटांपर्यंत ठेवावं. त्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुवावा, काही आठवडे हा प्रयोग नियमित केल्यास त्वचेचा तेलकटपणा संपुर्णपणे नाहीसा होवून त्वचा चमकू लागेल.
या घरगुती फेसपॅकचा उपयोग जरूर करा. कोरफड या वनस्पतीत मोठया प्रमाणात रस भरलेला असतो, थंड गुणधर्मामुळे हीचा उपयोग ब-याच प्रमाणात केला जातो, ब-याच वर्षांपासुन कोरफड औषध म्हणुन आणि सौंदर्य वाढीकरता उपयोगात आणल्या जाते आहे.’
Leave a Reply