ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांचा अमृतवेला कीर्तन दरबार, आजपासून जालन्यात प्रारंभ पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी उपस्थिती

October 11, 202116:11 PM 61 0 0

जालना : भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांच्या अमृतवेला कीर्तन दरबारास आजपासून जालन्यातील देऊळगावराजा रोडवर असलेल्या सिंधी दरबारात दररोज सकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत त्यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे.


अमृतवेला सत्संग ट्रस्ट आणि पुण्य सिंधी पंचायत जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून सुरु झालेला हा कीर्तन दरबार तब्बल चाळीस दिवस म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी साजरी होणार्‍या गुरु नानक जयंतीपर्यंत चालणार आहे. हा कीर्तन दरबार यु टूब चॅनलवर देखील पाहता येणार आहे. आज पहिल्या दिवशी भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांनी जिनि दिनु करि कै कीती राति ॥ यावर निरुपन केले. ते म्हणाले, धर्म एक नांव आहे. प्रत्येकालाच भगवंताशी जुटने आहे. प्रत्येकाचा मार्ग सुंदर आहे, परंतू त्यावर चालता देखील आले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने चांगला मार्गाचा स्वीकार करुन चालले पाहिजे. चांगल्या मार्गावर ठोकरही लागू शकते. परंतू ठोकर लागल्यामुळे चांलणेच बंद करावे का? असेही श्री. भाईसाहेब गुरुप्रीत सिंग यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *