ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाईश्री फाउंडेशन जालना चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न गरजु, होतकर विद्यार्थांचा शिक्षणासाठी भाईश्री फांऊडेशन मदत करणार – रमेश भाई पटेल

September 15, 202113:42 PM 62 0 0

जालना-प्रतिनिधी : शिक्षकांचे कार्य निश्चीतच उल्लेखनिय असून चांगला समाज, राफ व आदर्श व्यक्तीमहत्व घडवण्याची ताकद रमेश भाई पटेल यांनी केले. शिक्षक दिनांचे औचित्य साधुन भाईश्री फांऊडेशन जालना च्या वतीने, गटशिक्षणाधिकारी, विस्तारधिकरी केंद्रप्रमुख, गटसमन्वय, शिक्षक असा एकूण 38 जणांचा कोविड – 19 व ऑनलाईन शिक्षण यामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या आपले सक्रीय योगदान देणाऱ्या अधिकारी व शिक्षकाचा यथाचित सन्मान, गौरव करण्यात आला जालना तालुकयातील भाईश्री फॉर्म हाऊस देवमुर्ती येथे कार्यक्रम संपन्न झाला.


पुरस्कार मिळाल्यामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असुन यापुढे ही शैक्षणिक, सामाजिक व भाईश्री फाऊंडेशन राबवत असलेल्या विविध उपक्रमात अधिक जोमात कार्य करणार असे पुरस्कार प्राप्त शिक्षकानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाईश्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेशभाई पटेल होते. तर प्रमुख पाहूणे प्रविणभाई भानुशाली रमेशजी अग्रवाल होते, उपस्थित सर्वाचे आभार समन्वय सुनिल ढाकरके यांनी मानले. कार्यक्रमास सर्व सन्माननीय उपस्थित होते.
गौरव करण्यात आलेल्या अधिकारी शिक्षक सुर्यकांत नारायणराव कडेलवार, रविंद्र मधुकर जोशी, विनया विश्वभरराव वंडजे, गीता मोहनसा नाकाडे, अशोक बापुराव सोळंके , प्रभाकर रावसाहेब जाधव, बाबासाहेब लक्ष्मणराव जुंबड, बाबुराव भासु पवार, सरला केशवराव पवार, विलास नाना राजगिरे, विश्वनाथ उत्तमराव तिडके,अफसरा हुसेन इफतेखारी, सुनिता पांडूरंग महाजन, प्रतिक्षा चंद्रकांत डहाळे, अर्चना सुभाषराव गुंगे, स्मिता विष्णु ताराव, कल्पना विष्णु मुढे, मनिषा मुरलीधर हंडे, गबिता भगवानराव सरकटे, मिनाक्षी शरदराव कूळकर्णी, नित्या पुरूषोत्तम मनवर, अदिती गजानन लाटकर, सविता धनाजी बरडवाले, उदय लिंबाजी जगताप, अनिल गणेशराव खरात, राजेश श्रीराम उज्जैनकर, रमेश दादासाहेब मगर, श्रीधरी प्रकाश विष्णु, रवि जगनाथ तारो, विजय दामोदर पितळे, अर्जुन बाबुराव निकम, खुशालराव नारायणराव नागरे, राजु बाकीलाल पवार, मुन्सीफ हुसेन अमजद हुसेन, राजु संतुकराव खरात, पाद्देकर भास्कर अण्णा,अविनाश अरविंदराव कुळकर्णी, नागेश अशोकराव मगर.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *