ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारत बंदला देशातील प्रमुख १९ पक्षांनी,कामगार संघटना कृति समिती,किसान संघटना,विद्यार्थी,युवक संघटनांनी दर्शविला ​पाठींब

September 27, 202115:54 PM 13 0 0

अश्विनी निलेश धोत्रे

संयुक्त किसान मोर्चानी २७ सप्टेंबर रोजी घोषित केलेल्या भारत बंदला देशातील प्रमुख १९ पक्षांनी,कामगार संघटना कृति समिती,किसान संघटना,विद्यार्थी,युवक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. मुंबईमध्ये २७ तारखेला अंधेरी स्टेशन( पश्चिम) सकाळी ११ वाजता, राणी लक्ष्मीबाई चौक,सायन सकाळी ११:३० वाजता,रत्ना हॉटेल गोरेगाव( पश्चिम) सकाळी ११ वाजता प्रखर निदर्शने करून केन्द्र सरकारचा निषेध केला जाईल.


ह्या निदर्शनात,कॉग्रेस,राष्ट्रवादी,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,समाजवादी पार्टी,आप,लाल निशान ( लेनिनवादी) ,एसयुसीआय,भाकप माले,जनता दल (सेक्युलर),श्रमिक मुक्तिदल,एनएपीएम,हम भारत के लोग,सेव्ह डेमॉक्रॅसि,सेन्ट्रल विस्टा विरोधी भारत,विविध कामगार ,युवक,विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते सामील होतील. बीजेपीच्या केन्द्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे तीन कृषी कायदे रद्द करावेत,एमएसपीचा कायदा करावा,२०२० चा वीज कायदा रद्द करावा,केन्द्राने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत,डिझेल पेट्रोल,घरगुती गॅस दरवाढ मागे घ्यावी,महागाईला आळा घालावा,नवी शिक्षण निती हाणून पाडा ईत्यादी बंदच्या मागण्या आहेत.
या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कॉ.प्रकाश रेड्डी,कॉ.शैलेन्द्र कांबळे,कॉ.राजेन्द्र कोर्डे ,विशाल हिवाळे,विद्या ताई चव्हाण ,दिनकर दादा तावडे,आरती ताई साळवी,श्रमिका दळवी,सुहास मिया बाने, अभिषेक कदम ,मेहबूब शेख ह्यांनी सहभाग घेतला

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *