ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

December 29, 202119:29 PM 81 0 0

जालना   :- शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या शसकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात,शिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शसकीय वसतिगृहातील मुला-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहे.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,मुंबई व सहआयुक्त (शिक्षण) समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सुचनेनुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शासनाने सन 2020-21 व सन 2021-22 या कोरोना कालावधीतील विद्यार्थ्यांचे अर्ज घेण्यास मान्यत दिली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करावयाच्या वर्षातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असल्याबाबतचे संबंधीत महाविद्यालये, शिक्षण संस्थेचे उपस्थिती प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना सन 2020-21 व 2021-22 या कालावधीतील ऑनलाईन प्रणालीद्वारे घरी राहुन भाडे तत्त्वावर खोली घेवुन शिक्षण घेतलेले आहे या कालावधीतील ऑनलाईन शिक्षणासाठी संबंधित विद्यार्थ्यांने खर्च केलेला असल्याने योजनेंतर्गत पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निवास भत्ता अनुज्ञेय ठरविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज करताना सोबत 1 ते 16 कागदपत्रे, प्रमाणपत्रांच्या प्रती स्वत: साक्षांकित करुन मोबाईन क्रमांकासह अर्ज करावा. अपुर्ण व त्रुटीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अपुर्ण भरलेले, आवश्यक कागदपत्रे सादर न केलेले अर्ज रद्द समाजण्यात येतील. अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही.

संकेतस्थळ : http://sjsa.maharashtra.gov.in अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्राची यादी, योजनेच्या अटी व शर्ती इत्यादीवरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण व अंतिम दिनांक :- पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे सादर करावा. अधिक माहितीसाठी 02482- 225172 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *