ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारती विद्यापीठ आणि आय. एस. टी.डी.नवी मुंबई तर्फे कार्यशाळा संपन्न

March 17, 202212:43 PM 32 0 0

 पनवेल ( देवयानी कुलकर्णी) : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सर्च राईट कन्सल्टंट्स आणि इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, नवी मुंबई ह्यांच्या सहकार्याने “कामगार कायदे आणि त्याचे औद्योगिक संबंधांवर होणारे परिणाम” या विषयावर एका आठवड्याच्या कार्यशाळेचे आयोजन दि. ११ ते १६ मार्च २०२२ दरम्यान करण्यात आले. या कार्यशाळेस अरुण सेखरी, माजी . अध्यक्ष, कोटक महिंद्रा बँक, मुंबई, ह्यांना मुख्य वक्ता म्हणून बोलवण्यात आले होते.
डॉ. अंजली कळसे, संचालक, बी व्ही आय एम एस आर , नवी मुंबई, यांनी सत्राचे उद्घाटन केले आणि आयोजकांना आणि सहभागींना शुभेच्छा दिल्या. श्री नील रमेश, खजिनदार, आय. एस. टी.डी. नवी मुंबई, यांनी कार्यशाळेस भेट दिली आणि आयोजकांचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले. श्री.अरुण शेखरी यांनी केस स्टडीज सादर केले. आणि कामगार कायदे आणि औद्योगिक संबंधांबाबत आवश्यक कल्पना मांडल्या. वक्त्यांच्या संभाषणात भाग घेऊन, सहभागींनी उत्तम प्रतिसादही दिला आहे.
कार्यशाळेचे समन्वयक प्रा.कुलदीप भालेराव यांनी डॉ. विलासराव कदम प्रादेशिक संचालक, भारती विद्यापीठ संकुल नवी मुंबई , डॉ. अंजली कळसे संचालक,बी व्ही आय. एम. एस.आर नवी मुंबई आणि जयश्री काटकर, अध्यक्षा,आय. एस. टी. डी, नवी मुंबई, ह्यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.उपस्थित सहभागी प्रतिनिधी श्वेता थळकर, धनश्री अडसूळ, तन्वी जोशी, प्राजक्ता घोडेकर,मानस तांडेल आणि निधी ठाकूर ह्यांनी आयोजक आणि वक्ते ह्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *