ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाला भारतीय जनता पार्टी जिल्हा जालनाचा पाठिंबा; मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलवायेंगे

August 30, 202114:58 PM 56 0 0

जालना (प्रतिनिधी):- ठाकरे सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणुनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर मा. ना. रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार व आ. संतोष पाटील दानवे जिल्हाध्यक्ष भाजपा जालना यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी जालना तर्फे आज सोमवार दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता श्री बालाजी मंदिर संभाजीनगर जालना येथे शंखनाद घंटानाद आंदोलन आयोजित करण्यात आले होते.


सदरील कार्यक्रम प्रसंगी शहराध्यक्ष राजेश राऊत,श्री. रामेश्वर पाटील भांदरगे प्रदेश कार्यकारणी सदस्य, सिध्दीविनायक मुळे जिल्हा संघटन सरचिटणीस भाजपा जालना, धनराज काबलिये उपाध्यक्ष भाजपा, कपिल दहेकर जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा,हभप सुखदेव महाराज गोरे आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष ग्रामीण, बबनराव उजेड शहराध्यक्ष अध्यात्मिक आघाडी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब कोलते, शिवराज जाधव सरचिटणीस भाजपा, मयुर ठाकूर संघठण सरचिटणीस, शेखर बुंदेले शहर उपाध्यक्ष, सुनील खरे शहराध्यक्ष युवा मोर्चा, डोंगरसिंग साबळे, आकाश देशमाने, हरिभाऊ गोरे, महेंद्र अकोले, संजय माधवले, विनोद क़ोल्हे, विठ्ठल नरवडे, ज्ञानेश्वर काकडे व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ,घंटा व शंख वाजवून
” मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलायेंगे ॥
“उघडले डिस्को,पब आणि बार… नाही उघडले मंदीरांचे द्वार”
दार उघड…. दार उघड….उध्दवा दार उघड!!
हा नारा देत आंदोलन करण्यात आले व महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे सरकारला मंदीरांची दारे उघडण्यासाठी आर्त विनवणी करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *