उरण(संगिता पवार) – स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांवरील अन्याय सहन करण्यापलीकडे. – स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना ४०% व्यवसाय मिळायलाच पाहिजे. – सी. एफ. एस. नी मनमानी केल्यास गेटसमोरच चक्काजाम आंदोलन. – स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार.
उरण तालुक्यातील स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना ट्रान्सपोर्टचे काम न देणाऱ्या, सापत्नपणाची वागणूक देणाऱ्या, उपऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या सी. एफ. एस. विरोधात स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीं व स्थानिकांची ताकद काय असते हे दाखवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा उभारणार. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या न मिळाल्याने अनेक तरुणांनी बँकांची कर्जे काढून कंटेनर वाहतुकीच्या व्यवसायाकरिता ट्रेलर घेतले व व्यवसाय सुरू केला. परंतु सी. एफ. एस. कडून स्थानिकांना डावलून बाहेरील उपऱ्या ट्रान्स्पोटर्सना वाहतुकीचे काम दिले जाते व काही सी. एफ. एस. स्वतःचेच ट्रेलर वापरतात यामुळे अनेक स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना कंटेनर वाहतुकीचे काम मिळत नाही. स्थानिक वाहतूकदार त्यांच्यावर अन्याय होत असल्याने त्रस्त आहेत. अनेक स्थानिक तरुण वाहतूकदारांना कर्जाचे हप्ते न फेडता आल्याने त्यांचे ट्रेलर फायनान्स कंपन्यांनी खेचून नेले. परिणामी पुन्हा तरुण बेरोजगार होत आहेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. सी. एफ. एस. मालक बाहेरील उपऱ्या ट्रान्सपोर्टर्सना वाहतुकीचे काम देतात व स्थानिक वाहतूकदारांना डावलतात अशा अनेक तक्रारी भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल कडे आल्या आहेत. हा अन्याय सहन करण्यापलीकडे असून याबाबत लक्ष घालणार असून वेळ आलीच तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल .
जे. एन. पी. टी बंदरातील कंटेनर ने-आण करण्याकरिता हजारो ट्रेलर ची आवश्यकता लागत असते. यापूर्वी स्थानिक वाहतूकदारांचे जवळपास १२०० कंटेनर ट्रेलर होते. परंतु सी. एफ. एस. मालकांच्या स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना काम न देण्याच्या भूमिकेमुळे अनेकांनी ट्रेलर विकले व काही ट्रेलर कर्जाचे हप्ते न फेडता आल्याने बँकांकडे जमा झाले. आता फक्त ६०० च्या आसपास कंटेनर ट्रेलर शिल्लक आहेत. यामागे मोठे षडयंत्र असून स्थानिक वाहतूकदारांना पूर्णपणे नामशेष करण्याचा डाव आहे, हा डाव उधळून लावण्याकरिता आपले अस्तित्व टिकावे याकरिता स्थानिक ट्रेलर वाहतूकदारानी एकजूट व्हावे.
जे. एन. पी. टी. च्या अनुषंगाने जवळपास ३३ सी. एफ. एस. व लहान मोठे असे ५० पेक्षा जास्त खाजगी गोडावून्स आहेत त्या प्रत्येकठिकाणी उरण तालुक्यातील स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी एकूण कामापैकी
४०% वाहतुकीचे काम मिळायलाच पाहिजे याकरिता सर्व सी. एफ. एस. व्यवस्थापना सोबत चर्चा केली जाईल. सहकार्याची अपेक्षा असुन चर्चेतून मार्ग निघावा अन्यथा जे सी.एफ. एस. / गोडावून्स व्यवस्थापन स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी ४०% व्यवसाय राखीव ठेवणार नाहीत त्यांच्या गेटसमोर चक्काजाम आंदोलन करणार,
रस्त्यावर उतरून स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी लढा उभारणार.
Leave a Reply