अशी ही लोकशाही ,
येथे जनतेची पर्वा नाही….
जनतेनेच दिले निवडून
धान्यातील खडे काढावे तसे दिले फेकून
मनात आले नाही चुकून
पाच वर्षांनी भेट पुन्हा होई
येथे जनतेची पर्वा नाही
पैशाच्या जोरावर निवडून आला
निवडणूकीत कंगाल झाला
पाहता पाहता नेता बनला
करी तिजोरी भरायची घाई
येथे जनतेची पर्वा नाही..
पुढारी व्हायला लागत नाही डोकं
चालते कसंही बटाट्याचं खोकं
कारण संसदेत त्याला वाजवायची असतात फक्त बाकं
अंगठा लावतो हा येत नाही सही
येथे जनतेची पर्वा नाही..
जनतेच्या गळ्यात महागाईचा फास,
अन मंञ्यांनी बांधले बंगले खास खास
मंञी महोदय करतात विमानाने प्रवास
आमचा वनवास चुकला नाही
येथे जनतेची पर्वा नाही..
याच्या नावावर चालतात काळे धंदे मोठे मोठे , अन कागदावरच पूर्ण होतात प्रकल्प खोटे खोटे ,
नुसतेच मिरवतात बांधून शेला पागोटे
झाला सरकारचा घरजावाई
येथे जनतेची पर्वा नाही..
अशी आमची लोकशाही
लोकशाही नव्हे ही केवळ दांडगाई
येथे प्रत्येकजण चोरावर मोर होई
येथे गरीबाचा वाली कोणी नाही
येथे जनतेची पर्वा नाही…
हे भारूड माझ्या माया गौळण भारूड माला या संग्रहातील आहे .
माया तळणकर. नांदेड
९३२५०२८३७६
Leave a Reply