ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बदनापूर तालुक्यातील रस्ते व नदी खोलीकरण कामांस मंजुरी भाऊसाहेब घुगे यांच्या मागण्या ना. भुमरेंकडून मान्य

October 10, 202114:12 PM 4 0 0

जालना ( प्रतिनिधी) : बदनापूर तालुक्यातील पाणंद, शेत, वस्ती रस्ते आणि नदी- नाला खोलीकरणाची कामे मग्रारोहयो तून करण्यासाठी युवा सेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या मागण्या रोजगार हमी व फलोत्पादन मंञी ना. संदीपान भुमरे यांनी मंजुर केल्या असून मंजूरी चे पञ जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.


बदनापूर तालुक्यात ग्रामीण भागातील दळणवळणासह पाणी साठा वाढीच्या दृष्टीने महत्त्वापूर्ण असलेल्या विकास कामांबाबत माहिती देतांना भाऊसाहेब घुगे यांनी सांगितले की, भराडखेडा, अकोला निकळक, अन्वी, राळा, लक्ष्मण नगर, सोमठाणा, चित्तोडा येथील पानंद व शेत वस्ती रस्त्यांच्या कामांची अंदाजपत्रके मार्च महिन्यात सा. बां. उपविभागीय अभियंत्यांनी तहसीलदारांकडे मंजुरी साठी सादर केली. त्यास अद्याप पर्यंत प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने विकास कामे रखडली असल्याचे भाऊसाहेब घुगे यांनी ना. संदीपान भुमरे यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रलंबित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात असे नमूद करत भाऊसाहेब घुगे यांनी वरील गावांमध्ये नदी- नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आदेशीत करावे. अशा मागण्या रोजगार हमी व फलोत्पादन मंञी ना. संदीपान भुमरे यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केल्या होत्या. ना.भुमरे यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्या बाबत आदेश दिले आहेत. अशी माहिती भाऊसाहेब घुगे यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *