ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पोलिसांच्या खाकी वर्दीतील गुंडागर्दीविरोधात भीमशक्ती; पोलीस अधीक्षक कार्यालयावर मधडक मोर्चा काढणार

May 27, 202120:57 PM 74 0 0

जालना(प्रतिनिधी): जालना शहरातील पोलीसांची खाकी वर्दीतील गुंडागर्दी रोखण्याच्या मागणीसाठी तसेच एका तरूणाला पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिस अधिकार्‍यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्यावतीने दिनांक 10 जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद रत्नपारखे तसेच मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

तांदूळवाडी येथील सम्राट कृषी फार्मवर आयोजित या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना रत्नपारखे व निकाळजे यांनी सांगितले की, जालना शहरात गेल्या दोन वर्षांपासून पोलीस प्रशासनाची दहशत वाढली आहे.जालना शहर व जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळलेला आहेत, वाळू माफिया हैदोस घालत आहेत. याकडे कानाडोळा करणारे पोलीस प्रशासन विनाकारण सर्व सामान्य माणूस, सामाजिक कार्यकर्ते यांना नाहक मारहाण करून त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथे मागासवर्गीय 2 भावंडांचा खून करण्यात आला. या खूनप्रकरणी आरोपींना अटक करुन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंबेडकरी चळवळीच्या नेते व कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. तसेच त्यांची धरपकड केली. पानशेंद्रा येथील बोर्डे भावंडांचा खून होण्यापूर्वी पोलिसांनी दोन्ही समाजाला समज देवून त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर हे खून झाले नसते. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चालू आहे. या काळात अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणार्‍या नागरिकांना पोलिसांची मारहाण आजही सुरु आहे. गतवर्षीच एका गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तरुणांना सतकार कॉम्प्लेक्स समोर बेदम मारहाण केली व त्यांची धिंड काढली.नुकतेच ट्रासिटी प्रकरणात लाच घेताना पकडल्या गेलेले उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या अत्याचाराच्या कहाण्या आता समोर येवू लागल्या आहेत. खिरडकर यांनी खाकीवर्दीत कशी गुंडागर्दी केली. याबाबतच्या तक्रारी नागरिक, सामाजिक संघटना सरकार व न्यायालयाकडे दाखल करीत आहे.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे दि. 9 एप्रिल 2021 रोजी एका तरुणाचा औषधोपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. या तरुणाच्या नातलगांनी दीपक हॉस्पिटल येथे संताप व्यक्त केला व हॉस्पिटलची थोडीफार तोडफोड केली. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रशांत महाजन यांनी हॉस्पिटलमध्ये येवून मयत तरुणाच्या नातलगांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. या शिवीगाळ व दमदाटीचे चित्रिकरण करणार्‍या शिवराज नारीयणवाले या तरूणास
हॉस्पिटलमध्येच सुधीर खिरडकर, पोलिस निरिक्षक प्रशांत महाजन व अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी जनावरासारखी मारहाण केली. या मारहाणीचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर आले आहेत. तसेच या संदर्भातील बातम्याही प्रसार माध्यमांनी छापल्या आहेत. सदरील तरुणास झालेली मारहाण ही माणूसकीला काळीमा फासणारी असून, वेदनादायी आहे, पोलिस प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. जालन्यात जनतेचे रक्षक समजले जाणारे पोलिसच जनतेचे भक्षक झाले आहेत. पोलिसांनी गुंडागर्दी आम्ही खपवून घेणार नाही.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

सदरील तरूण कोणत्या समाजाचा आहे, हे महत्त्वाचे नाही, केवळ माणूसकीचा विचार करून भीमशक्तीने हे प्रकरण हातात घेतले आहे. सदरील तरूण हा भाजपचा पदाधिकारी आहे, भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अद्याप कोणतीही भूमिका विषद केलेली नाही, ते गप्प आहेत, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांस न्याय न देणारे ना. दानवे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तरूणास अमानुषपणे मारहाण करणार्‍या उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरिक्षक प्रशांत महाजन व अन्य पोलिस कर्मचार्‍याविरोधात पोलिस अधिक्षकांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.खिरडकर व महाजन यांच्याविरुद्ध भादवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, ही कारवाई न झाल्यास भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर दि. 10 जून रोजी धडक मोर्चा काढण्यात येईल,जर या धडक मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली तरीही भीमशक्तीच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही प्रमोद रत्नपारखे व सुधाकर निकाळजे यांनी यावेळी दिला.
या पत्रकार परिषदेत भदंत शाक्यपूत्र धम्मधर, भीमशक्तीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य रोहिदास गंगातिवरे, शहराध्यक्ष किशोर बोर्डे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *