ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने भिमशक्तीचे रक्तदान शिबीर संपन्न

April 30, 202112:36 PM 33 0 0

जालना/ प्रतिनिधी भारतरत्न तथा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 130 व्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर भिमशक्तीच्या वतीने रक्तदान शिबीरे घेऊन रक्तदान करुन डॉ.बाबासाहेबंाची जयंती साजरी करण्याचे आवाहन भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून भिम शक्तिच्या 27 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे.

या रक्तदान शिबीरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शिबीराची सुरुवात करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस प्रमोदकुमार रत्नपारखे, मराठवाडा सरचिटणीस संजय भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष सतिष वाहुळे, शहराध्यक्ष राजु पारखे यांच्यासह 27 जणांनी रक्तदान केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष मिलींद हिवराळे, समता शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, शामभाऊ सिरसाठ, दिपक दांडगे, महिला पदाधिकारी विशाखा सिरसाठ, सुनिता गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *