जालना: जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी आज (ता.२४)काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. नांदेड येथील भक्ती लाॅन्स येथे आयोजित काॅग्रेस पक्षाच्या मेळाव्यात भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा काॅग्रेस पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. भीमशक्ती’चे प्रदेश संघटक कुमार कुर्तुडीकर, प्रदेश सरचिटणीस मोहन माने, मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे आदींनी काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व भीमशक्तीचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. या मान्यवारांनी भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांचे काॅग्रेस पक्ष प्रवेशाबद्दल स्वागत केले.
या प्रवेश सोहळ्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री तथा भीमशक्तीचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून सुधाकर निकाळजे यांची ओळख आहे, आंबेडकरी चळवळीत कार्य करतांना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. दीड वर्षापूर्वी कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची सगळ्यांनीच दखल घेतली. उपेक्षित, वंचित, घटकांच्या प्रश्नासाठी रस्यांवर उतरून निकाळजे यांनी अनेक आंदोलने केली आहेत.
Leave a Reply