ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मन विदीर्ण करणाऱ्या परिस्थितीत शिक्षणासाठी धडपडणाऱ्या शिक्षकाच्या संघर्षाची गाथा म्हणजे  भिनवाडा  – ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे

December 21, 202113:05 PM 56 0 1

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : मन विदीर्ण करणाऱ्या परिस्थितीत शिक्षणासाठी धडपडणाऱ्या शिक्षकाच्या संघर्षाची गाथा म्हणजे भिनवाडा ही कादंबरी असून दुर्गम भागात काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाविषयी नवा दृष्टीकोन निर्माण करणारी आहे असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी मायणी ता. खटाव येथील विठोबा मंगल कार्यालयात  भिनवाडा च्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले. सातारा जिल्ह्यातील मायणी येथील आदर्श प्राथमिक शिक्षक बाळासाहेब कांबळे लिखित भिनवाडा या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून श्री वाघमारे बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.रणधीर शिंदे ,खटावचे माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर,कादंबरीकार आनंद विंगकर,लेखक बा.ना.धांडोरे,लोकायत प्रकाशन चे प्रकाशक राकेश साळुंखे,पत्रकार संपत मोरे,पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ रणधीर शिंदे म्हणाले, “भिन वाडा ही एका अनाहूत प्रदेशातील लोकांच्या जगण्यासाठी चाललेल्या संघर्षाची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाची कथा सांगते.दुर्गम भागातील खेड्यातील माणसांच्या जगण्यातील अस्वस्थ सामाजिक वर्तमान मांडणारी कादंबरी आहे. माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर यांनी आपल्या लेखन शैलीतून सामाजिक लेखन करून नवी दृष्टी देणाऱ्या बाळासाहेब कांबळे यांचे कौतुक केले. कादंबरीकार आनंद विंगकर यांनी भिनवाडा ही कादंबरीची तुलना“बनगरवाडी” या कादंबरीशी करून बाळासाहेब कांबळे यांच्या सरस लेखणीने नव्या प्रदेशाकडे पाहण्याची नवी दृष्टी निर्माण केली आहे.एका वेगळ्या विश्वातील लोकांचे जगणे आणि जगण्यासाठी चालणारा संघर्ष आपल्या भिनवाडा मधून मांडला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात पुस्तकाचे लेखक बाळासाहेब कांबळे, पत्रकार संपत मोरे,रहिमान नायकवडी लेखक बा.ना. धांडोरे,किरण जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अमृतवेलचे संपादक धर्मेंद्र पवार, “हिरकणीच्या” कार्यकारी संपादक विद्या सुरजकुमार निकाळजे,शिक्षक नेते सुनिल सावंत,डॉ.बाळासाहेब कर्पे,बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब कचरे,ग्रा.प. सदस्य रणजीत माने,डॉ.मानसी जगदाळे,डॉ.सुनिता रोकडे,प्रा.प्रशांत भंडारे,उद्योजक सागर कांबळे,बहुजन कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष एस आर भोसले,माजी केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर तसेच कला ,क्रीडा , शिक्षण,पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कवयित्री कुंदा लोखंडे – कांबळे यांनी प्रास्ताविक केले.विनोद कांबळे यांनी आभार मानले सूत्रसंचालन आबासाहेब जाधव यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *