आपणास माहित आहे आज पर्यंत कितीतरी भोंदू बाबा जेल ची हवा खात आहेत.यामध्ये आसाराम बापू,राम रहीम यासारखे आता जेलमध्ये आहेत.अंधश्रद्धा नाहीशी होण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर याना तर स्वतःचे प्राण ध्यावे लागलेले आहे त्यांच्या हत्ये नंतर महाराष्ट्रात आजही भोंदू बाबा ची कमी नाही.कारण भोंदू बाबाची गिऱ्हाईक सर्वत्र सहज मिळत आहेत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा आता समाजातील होत नाहीत.आपली बुद्धीच त्यांनी दुसऱ्याकडे गहाण ठेवली आहे. शहानिशा न करता भोंदू बाबा सांगेल त्याप्रमाणे लाखो रुपये देत असतात आणि मग पूर्ण फसल्यानंतर पोलीस स्टेशन कडे धाव घेतात.तो पर्यंत तो भोंदू बाबा चांगली लूटमार करून चांगली संपत्ती मिळवून गब्बर होऊन त्याचे विरुद्ध कोणी तक्रार केली तर त्याला दमबाजी किंवा त्यांचेवर जादूटोणा करणेची किंवा त्यांचेवर करणी करणेची धमकी देतात त्यामुळे असे फसलेले पुरुष किंवा महिला भीतीमुळे त्यांचे विरुद्ध तक्रार करत नाहीत.पण यामुळे अशा भोंदूबाबाबाची संख्या वाढलेली आहे.त्या पैकीच एक परवा वाचलं आहे ते कसे फसले आहेत यातून आपण बोध घेतला पाहिजे.
एका भोंदु बाबाने अघोरी विधेचा वापर करून भक्ताला २३ लाखांना गंडविले. माहूर येथील एका भोंदूबाबाचा भांडाफोड अंनिसच्या मदतीने झाला असुन पोलिसांनी त्याला व त्याच्या अन्य २ साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. आयुर्वेदीक उपचाराच्या नावाने एका रुग्णाच्या मजबुरीचा गैरफायदा उचलत दैवी शक्ती आपल्याला प्रदान असल्याचे भासवून वेळोवेळी विविध कारणे देऊन बँकेतील आरटीजीएस व इतर स्रोत वापरून तब्बल २३ लाख १४ हजार ५४९ रुपयांवर डल्ला मारला.या प्रकरणी भोंदू बाबा व त्याच्या अन्य ३ सहकाऱ्यावर माहूर पोलिसात विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर येथील विश्वजित रामचंद्र कपिले हा आयुर्वेदिक उपचार करत असून त्याला अलौकिक शक्ती प्राप्त आहे व तो अनेक रोगांवर उपचार करतो अशी माहिती मित्राकडून प्राप्त झाल्याने माहुरच्या कपिले बाबांची ओळख होऊन बाबांच्या होम हवन व इतर विधीमुळे एखाद्याला असलेला असाध्य आजार बरा होईल म्हणून तक्रारदार प्रवीण निवृत्ती शेरेकर ३९,रा.कोपर रोड जय गणेश वास्तू डोंबिवली हा कपिले बाबाच्या जाळ्यात अलगद अडकला.उपचाराच्या नावावर अंधश्रद्धेचा वापर करून डिसेंबर २०१३ ते डिसेंबर २०२० या दरम्यानच्या काळात भोंदूबाबा कपिले व त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर तक्रारदाराच्या बँक खातेक्रमांका वरून १६ लक्ष ५० हजार रुपये आरटीजीएस द्वारे पाठविण्यात आले कपिले बाबा यास कुटुंब आहे व नागपूर येथे त्यांचेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.कपिले बाबा हा तक्रारदार व अन्य मंडळींचा शाररिक व मानसिक छळ करुन फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्या नंतर या सर्व गोष्टीचा जाब विचारण्यासाठी ४ जानेवारी २०२१ तक्रारदार व उद्धव माने ,राहुल आराध्ये असे मिळून कपिले बाबांच्या दत्तयोग आश्रम व त्यांच्या कुटूंबियाकडे पुसदला गेले.
रवी कपिले ,कैलास कपिले व इतर एकाची भेट झाल्यावर तुम्ही आम्हाला का फसविले अशी विचारणा तक्रारदार शेरेकर यांनी केली असता, त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन तुम्ही आमच्या वर कायदेशीर कारवाई केली तर आम्ही तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर करणी करू व पोलीस कारवाईची धमकी दिली.त्यामुळे आम्ही सर्व घाबरून विश्वजीत कपिले व त्याच्या कुटूबिविरुद्ध तक्रार दिली नाही.
कपिले बाबा हा स्वतःमध्ये दैवीशक्तीचा संचार झालेला आहे.त्या आधारे दत्तयोग आश्रममध्ये येणाऱ्यांना व आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली हवन भूतबाधा काढणे,लक्ष्मी बंधन तोडणे, मटका आकडा सांगणे,पैसे घेऊन शक्तिपात देणे, कासव आणि मांडूळ यांचा गुप्तधन काढण्यासाठी विधी असे.गुप्तधन शोधण्यासाठी माहूर किल्ला परिसरात खड्डेही खोदले होते.याकामासाठी त्याचा भाऊ रवी कपिले ,कैलास कपिले मदत करीत होते.असे तक्रारदार शेरे यांनी तक्रारीत नमूद केले.
कपिले बंधू व अन्य एक जण संगनमत करून विश्वजित याच्या अंगात दैवीशक्ती संचारते,असे भासवून आणि जादूटोणा व आजारपणाची भीती दाखवून मानसिक शारीरिक छळ करीत.वेळोवेळी १६ लाख ५० हजार रुपये आरटीजीएस द्वारे व रोख स्वरूपात २लाख व ४ लाख ६४ हजार ५४९ रुपये ,असे एकूण २३ लक्ष १४ हजार ५४९ रुप्याचीफसवणूक केली आहे.त्यांसायवर कारवाई करावी अशी तक्रार प्रवीण शेरेकर यांनी दिली. त्यावरून माहूर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता उपरोक्त विश्वजित कपिले व रवी,कैलास कपिले सर्व रा.कदम ले आऊट पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला.तसेच आरोपीने पुसद वरून बुधवारी ताब्यात घेतले.पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव रिठे हे करीत असून या प्रकरणात तपासात अधिक धक्कादायक सत्य उजेडात येईल.अशी चर्चा आहे. या आरोपींना कोर्टात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
समाजातील लोकांनी जागृत झाले पाहिजे.शासनाने सुद्धा प्रबोधनपर,नाटय, एकांकिका,पथनाट्य आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या प्रसार माध्यमातून प्रसारित केली पाहिजेत तरच वरील प्रमाणे चांगले सुशिक्षित असणारे फसतात तर अशिक्षित लोकांचे काय होत असेल ? त्यासाठी अशा “भोंदू बाबांना बेड्या ठोकल्या पाहिजेत ” तरच पुढच्यास ठेच मागचा शहाणा तरी होईल असेच वाटते.
लेखक
जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न.७५८८५६०७६१.
Leave a Reply