ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण शहर विकासाच्या दिशेने, सिमेंट कांक्रिट रस्त्यांचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन

August 27, 202117:04 PM 44 0 0

उरण (संगिता पवार) राज्य सरकारच्या नगरविकास विभाग व एम एम आर डी एच्या निधीतून उरण शहरातील रस्त्यांच्या कामासाठी ४८ लाखांचा निधी खर्च होऊन खड्डे मुक्त उरण आणि विकसित उरण अशी शहराची ओळख मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मधून त्यांनी विविध विकासासाठी देऊ केलेल्या १०० कोटींच्या निधीतून निर्माण झाली आहे.त्याच धर्तीवर उर्वरित भवरा ते मोरा या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ वैभव कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आज होत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात उरण शहर हे नव्या रुपात दिसू लागले.असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला.


उरण नगर पालिका हद्दीतील भवरा – मोरा या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटच्या रस्त्यासाठी सरकार कडून आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.काँक्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गणपती मंदिर भवरा- मोरा रोड येथे पार पडला.यावेळी उरणच्या नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा गट नेते रवि भोईर,मा.उपनगराध्यक्ष चिंतामण घरत,मोरा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन प्रविण कोळी,मा नगरसेविका यासिन गँस,मा नगरसेविका नंदा माझगावकर, नगरसेवक नंदुकुमार लांबे, राजेश ठाकूर, नगरसेविका सौ रजनी कोळी, नगरसेविका सौ आशा शेलार, शहराध्यक्ष कौशिक शहा, हितेश शहा,निलेश पाटील, नरेश गावंड,स्वप्निल मयेकर, सुरेश शेलार, महेश ठाकूर, जयराम जाधव,समिर मुकरी,निरा कातकरी,बापु शिट्टोले,अहुर शेख, चंद्रकांत कोळी, देवेंद्र भोईर,हुच्चाप्पा दहीसर,राजू कदम, वैभव कन्स्ट्रक्शनचे वैभव देशमुख, संपदा थळी, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, नगरसेवक व पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.
राज्यातील आघाडी सरकारकडून विकास निधी उपलब्ध करून न देता,नगर पालिका करत असलेल्या विकास कामात खोडा घालण्याचे काम उरण मध्ये होऊ घातलेली महा विकास आघाडीचे नेते गण करत आहेत.आणि अशा नेत्यांना सध्या नगर पालिका निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत.त्यामुळेच ते सैरभैर झाले असून नगर पालिकेच्या पारदर्शक कारभारावर टीका टिप्पणी करत आहेत.आणि फुल मार्केट साठी मंजूर झालेला ५ कोटींचा निधी राज्य सरकारने परत घ्यावा यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार करत आहेत.परंतु त्यांच्या अशा द्वेषाच्या राजकारणाला कोणी भीक घालत नाही.उलट शहरातील जनतेला मागील निवडणुकीत जी वचने दिली होती.त्याची पुर्तता भाजपा नगर पालिकेच्या माध्यमातून राबवत असलेल्या विविध विकास कामातून शहरातील जनता पाहत आहे.तसेच भवरा,मोरा येथील अबालवृद्धासाठी हक्काचे गार्डन असावे यासाठी समल डिपार्टमेंटची जागा नगर पालिका आपल्या ताब्यात लवकरच घेणार असून येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्याठी प्रयत्न करणार आहे.आणि रेंगाळत पडलेल्या बायपास रस्ताच काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगून यापुढे ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपला सेवक म्हणून कार्यरत राहणार आहे.असा विश्वास शेवटी आमदार महेश बालदी यांनी उपस्थितांना दिला.
दरम्यान भविष्यात उरण शहराच्या विकासासाठी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.असे मा उपनगराध्यक्ष चिंतामण घरत यांनी नमूद करत नगर पालिका राबवित असलेल्या विविध विकास कामांचे कौतुक केले.यावेळी नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली राबवित असलेल्या विविध विकास कामांची प्रसन्ना केली.व उरण नगर पालिकेवर पुन्हा भाजपाचा झेंडा हा जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने फडकेल असा विश्वास व्यक्त करत विरोधक कशा प्रकारे शहरातील विकास कामांत खोडा घालतात यांचा पाढाच उपस्थितांसमोर वाचून काढला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *