ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजीप शाळा खोपटे शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा रामशेठ ठाकूर यांच्या हास्ते संपन्न

November 1, 202112:36 PM 36 0 0

उरण ( संगिता पवार ) खोपटे येथे गेले कित्येक वर्ष नादुरुस्त असलेल्या राजीप शाळेच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 31 ओगस्ट रोजी संपन्न झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कुदळ मारून या शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला.सदर शाळेसाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी डीपी वर्ल्ड कंपनीकडून 5.15 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला आसून कामाचा दर्जा उत्कृष्ठ असावा यासाठी ते स्वत: जातीन लक्ष देणार आहेत.


खोपटे प्राथमिक शाळेची इमारत खूप जीर्ण झाली होती.त्यामुळे ती बांधण्याची हालचाल खोपटे ग्रामपंचायती मार्फत गेले 3 वर्ष प्रयत्न चालू होते.त्यासाठी सरपंच विशाखा ठाकूर व त्यांचे पती भाजप पंचायत समिती चिरनेर गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य सातत्याने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत होते.शेवटी उरणचे आमदार महेश बालदी यांनी आपल कसब वापरत डीपी वर्ल्ड कंपनी कडून 5.15 कोटी निधी या खोपटे शाळेसाठी मंजूर करून घेतले.
हि शाळा कंपनी स्वत: बांधणार असून ती प्रशस्त वा आधुनिक असणार असून जिल्ह्यात रोल मोडल असणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्याचबरोबर.या शाळेत इंग्रजी माध्यम सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, पंचायत समिती सभापती समिधा म्हात्रे ,उप सभापती शुभांगी पाटील ,सीइओ डीपी वर्ड जिबू के.इट्टी ,सीइओ एफ.ती.झेड. रंजित रे , गटविकास अधिकारी नीलिमा गाडे.,सरपंच विशाखा ठाकूर , उरण च्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, प्रशांत ठाकूर , आजी माजी जिल्हा परिषद सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *