ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मंत्री महोदयांच्या उपस्थित उरण बायपास रस्त्याचे लवकरच भूमी पूजन सोहळा

May 27, 202220:25 PM 29 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय असणाऱ्या उरण बायपास रस्त्याच्या कामांचा शुभारंभ लवकरच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई सूनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.त्यासाठी सिडकोने जय्यत तयारी सुरू केली आहे.एकंदरी उरणकराना वाहतूक कोंडीतून मुक्त करणाऱ्या उरण बायपास रस्त्यामुळे गोपाळ पाटील यांचे स्वप्न साकार होणार आहे.
उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यात तालुक्यातील खेड्याचे व उरण शहराचे नागरीकरण ही झपाट्याने वाढत आहे.अशा वाढत्या नागरीकांच्या नागरी सुविधांची पूर्तता करणारी मुख्य बाजारपेठ तसेच शासकीय कार्यालये उरण शहरात असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकांची रेलचेल सुरू असते, त्यात शहरातील अरुंद रस्ते यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.अशा वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी उरण कोट नाका ते उरण पेन्शन पार्क पर्यंत बायपास रस्त्याची निमित्ति करण्यात यावी अशी मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी तत्काळीन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या कडे वारंवार पत्र व्यवहार करुन केली होती.
त्या अनुषंगाने तात्काळीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सिडको,उरण नगर पालिका आणि संबंधित अधिकारी व गोपाल पाटील यांच्यात संयुक्तपणे बैठकीचे आयोजन ही केले होते.त्यावेळी सदर बायपास रस्त्याच्या जागेचे सर्वेक्षण करून तात्काळ निधी मंजूर करण्यात यावा असे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिले.परंतु गेली अनेक वर्षे शासन,सिडको कडून निधी मंजूर होऊन ही व निविदा प्रक्रिया होऊन ही आज गेली अनेक वर्षे उरण बायपास रस्त्याचे काम रेंगाळत पडले.त्यामुळे नागरीकांना, चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि उरण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माजी आमदार मनोहर भोईर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण
बायपास रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात यावे यासाठी शासनस्तरावर वारंवार मागणी केली.या मागणीची दखल घेऊन उरण बायपास रस्त्याच्या कामासाठी सिडकोच्या माध्यमातून ४५ कोटीचा निधी मंजूर होऊन, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.सदर बायपास रस्त्याच्या कामांचा टेंडर नवीमुंबई येथील एका नावाजलेल्या कंपनीला देण्यात आला असून लवकरच उरण बायपास रस्त्याचा भूमी पूजन सोहळा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई सुनिल तटकरे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.त्यासाठी सिडकोने जय्यत तयारी सुरू केली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *