मोर्शी तालुका प्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते हिवरखेड येथील पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पांदण रस्ते हा शेतकऱ्यांच्या व गावाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात अशा यंत्र सामग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत पांदण रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले .आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील पांदण रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या दृष्टिकोनातून पांदन रस्ते योजना राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात येत आहे.
हिवरखेड येथील हिवरखेड ते हनुमान मंदिर पर्यंत, हनुमान मंदिर ते रामपूर कॅनल पर्यंत, मारोतराव काळे ते बंडू पाटील यांच्या शेतापर्यंत, बंडू पाटील ते साहेबराव होले यांच्या शेतापर्यंत, सुजित धरमकर ते नंदू तिडके यांच्या शेतापर्यंत, शरद राऊत ते किसना वैराळे यांच्या शेतापर्यंत, मोहनराव तोटे ते मदन बाडखे यांच्या शेतापर्यंत, माणिकराव सदाफळे ते नारायण आमले यांच्या शेतापर्यंत, लखन नायक ते सुभाष देवघरे यांच्या शेतापर्यंत गणेश गुडधे ते दामोदर वानखडे यांच्या शेतापर्यंत, नारायनसिंग बघेल ते पुंडलिक अमृते यांच्या शेतापर्यंत, श्रीपादराव ढोमने ते विनोद ढोरे यांच्या शेतापर्यंत, अनिल चरडे ते विजय भोजने यांच्या शेतापर्यंत, अमोल तोटे ते केशव वासनकर यांच्या शेतापर्यंत, अमोल तोटे ते विनायक गहुकर यांच्या शेतापर्यंत , मनोज मोकलकर यांच्या शेतापासून ते त्र्यंबक गिरी यांच्या शेतापर्यंत, मारोतराव भुंते ते मधुकर तडस यांची शेतापर्यंत पांदण रास्ता, हिवरखेड येथील असे १८ किलो मीटर लांबीच्या पांदण रस्त्याच्या मातीकाम व दबई कामाचा शुभारंभ मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आला.
“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीच्या ज्या गरजा आहेत त्या अगोदर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. चांगला शेतरस्ता ही तर शेतीची बेसिक गरज असून मतदारसंघातील शेवटचा शेतरस्ता सुधारेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील” अशी भावना याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, माजी शिक्षण सभापती श्रीपादराव ढोमणे, हिवरखेड येथील सरपंच विजय पाचारे, पोलिस पाटील सुभाष नागले, हरिमोहन ढोमणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश विघे, माजी पं. स. सदस्य अनिल अमृते, सचिव संजय दौड, राजुभाऊ गेडाम, रतन घोरपडे, गणेश धोटे, सुशांत निमकर, कैलास बारस्कर, मारोतराव उघडे , दिलीप कवटकर, अमोल महल्ले, सतिश ढोमने, प्रशांत वाघमारे, वकिल कुरैशी, ईसराल कुरैशी, सचिन बडोदेकर, महेश महल्ले, भिमराव दंडाळे, मनोज मोकलकर, पंकज पाचारे, सुनील पाचारे, वकिल शेख, समीर विघे, निखिल फलके, व ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply