ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खुरगावला १९ रोजी बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना भूमीपुजन सोहळा

May 17, 202215:12 PM 30 0 0

नांदेड – बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना भूमीपुजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम, क्षेत्रीय विकास अधिकारी चंद्रशेखर दहिवळे, विपश्यनाचार्य गौतम भावे, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे, बहुजन संघर्ष सेनेचे सुखदेव चिखलीकर, माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, शंकर गोडबोले, एल. आर. कांबळे, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, धम्मदान आणि धम्मसंदेश यात्रेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, धम्मसेवक निवृत्ती लोणे, उपासिका सुरेखाताई इंगोले यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६६ वा जयंती सोहळा पौर्णिमोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. दहा फुटांच्या अखंड पाषाणातील संगमरवरी दगडाची बुद्धमूर्ती प्रशिक्षण केंद्रात बसविण्यात येणार आहे. त्याचा भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून याशिवाय परित्राणपाठ, त्रिसरण पंचशील, अष्टशील, दसशील, त्रिरत्न वंदना, गाथापठण, बोधीपुजा, बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना भूमीपुजन, आनापान ध्यान साधना, धम्मदेसना, भोजनदान, आर्थिक दान आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच भदंत पंय्याबोधी, भिक्खूनी वंदना, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते सुनंद, भंते शिलभद्र, भंते सुमेध, भंते सुगत यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवस घेण्यात आलेल्या श्रामणेरी श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे.
भिक्खू संघाला आणि सर्व उपस्थितांना उपासिका सुरेखाताई साहेबराव इंगोले यांच्याकडून भोजनदान करण्यात येणार आहे. तरी भूमीपूजन सोहळ्यासाठी परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका आणि समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यांनी घेतली होती श्रामणेर दीक्षा…
बुद्ध जयंतीनिमित्त दसदिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात सुमेश चौदंते, सुधीर लोणे, कपिल खंदारे, राष्ट्रपाल खंदारे, नैतिक पोटेकर, संविधान सावंत, आकाश राऊत, सोहम सावंत यांना भिक्खू संघाने दीक्षा दिली. तर भिक्खूनी वंदना यांनी बायना फुनसे, नंदिनी कुलदीपके, पौर्णिमा कुलदीपके, गौतमी कुलदीपके, समृद्धी आठवले या मुलींना श्रामणेरी दीक्षा देण्यात आली. १९ मे नंतर शहर व जिल्हा परिसरातील बौद्ध उपासक उपासिका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शिबिराची सांगता होणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *