ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा विकास कामांचा धडाका आवरे येथे विकासकामांचे माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

November 10, 202116:47 PM 38 0 0

उरण दि 9(राघवी ममताबादे ) शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण-पनवेल-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत उरण तालुक्यातील आवरे येथे रस्त्याचे काम व आवरे येथे हायमास्ट बसविणे कामाचे भूमिपूजन माजी आमदार मनोहरशेठ यांच्या शुभहस्ते पार पडले.तसेच कडापे येथील शाळा दुरुस्तीचे काम देखील या योजेनेअंतर्गत मंजूर झालेले आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा कामगार नेते महादेव घरत, आवरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच निराताई पाटील, शाखाप्रमुख सुनिल ठाकूर, शिक्षकसेना कोकण कार्यध्यक्ष कौशिक ठाकूर, महेश गावंड, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनिराम पाटील, युवासेना अधिकारी अमित म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अरुण गावंड, अनिल पाटील, भाई पाटील, के.टी.गवंड, ना.क.गावंड गुरुजी, बाळकृष्ण गावंड, अरुण थळी, सोहम भोईर आदी उपस्थित होते. तसेच यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आवरे गावातील स्वयंभू भोलेनाथाचे दर्शन घेतेले.रस्त्याचे व हायमास्टचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *