जालना : युगपुरूष लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त येथील सावरकर प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त टाऊनहॉल स्थित लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, प्रेमकुमार वाघमारे, शुभम कौडगावकर, अनंत देशमुख, रामेश्वर टेहरे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली असून, नगर पालिकेने पुतळ्याची रंगरंगोटी व डागडुजी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुतळ्याकडे नगर पालिकचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप टिळक प्रेमींतून होत आहे.
रामेश्वर टेहरे यांना बक्षिसाचे वितरण
जालना:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती उत्सव समिती 2021 च्या वतीने आयोजित रांगोळी रेखाटन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे बक्षीस रामेश्वर टेहरे यांना लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वितरित करण्यात आले. यावेळी उत्सव समिती अध्यक्ष गणेश लोखंडे, वेदमूर्ती सुमित कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष शुभम कोडगावकर,प्रेमकुमार वाघमारे, अनंत देशमुख आदी. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली.
Leave a Reply