नांदेड- शहरातील देगावचाळस्थित प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची २९६ वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी साहित्यिक गंगाधर ढवळे सर, कवि निवृत्ती लोणे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, सुभाष लोखंडे, सौ.निर्मलाबाई पंडीत, सौ.शिल्पाताई लोखंडे, उपा.शोभाबाई गोडबोले यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, लोकमाता अहिल्याबाई होळकर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प पुजा साहित्यिक गंगाधर ढवळे सर, कवि निवृत्ती लोणे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, सुभाष लोखंडे,सौ.निर्मलाबाई पंडीत,सौ.शिल्पाताई लोखंडे, उपा.शोभाबाई गोडबोले यांच्या हस्ते प्रतिमांना धूप दीप पूजन व माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी लहान बालक व बालीका राहुल दुधमल,कु.अवंती कदम,कु. शितल लोखंडे, प्रणव दिपके, राहुल कदम, पाखी लोणे, हर्षदीप लोखंडे, दक्षक खाडे, कर्तव्य खाडे, सम्राट चिंतोरे, प्रथमेश दिपके, स्वदीप गोडबोले,योगेश थोरात, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
Leave a Reply