( जालना प्रतिनिधी ):- वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क कार्यालय येथे आज दिनांक 07/10/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली बदनापुर येथील भाजप कार्यकर्ता आकीलभाई पठाण, समाजवादी पार्टी शहर अध्यक्ष बदनापुर अतिकभाई शेख, शारुखभाई शेख भाजप व समाजवादी पार्टीचे कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश.
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय क्षेत्रातील अभ्यास व वंचितांना सत्येत आणण्याच्या दुरष्टीने बदनापुर येथील समाजवादी पार्टीचे बदनापुर शहर अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते यांनी विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वात जाहिर प्रवेश करुन वंचित बहुजन आघाडी बदनापुर तालुक्यात जास्त संख्येन येणाऱ्या नगर पंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समिती उमदेवार निवडुन आणु असे जिल्हाध्याक्षांना आश्वासन दिले. व लवकरच बदनापुर तालुक्यामध्ये सभासद नोंदणी अभियान, गाव तेथे शाखा, पक्ष बांधणी उद्यापासुन मोठया जोमाने सुरुवात करणार आहोत असे तालुका अध्यक्ष रवि वाहुळे यांनी स्पष्ट केले. यावेळी जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, विष्णु खरात, ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत कसबे, प्रा संतोष आढाव, पावलस वाघमारे बदनापुर तालुका अध्यक्ष रवि वाहुळे, अजय महापुरे, अकिलभाई पठाण, अतिकभाई शेख, शाहरुखभाई शेख, रितेश पाईकराव सह वंचित बहुजन आघाडी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply