जालना। गोकुळाष्टमीचे औचित्य साधुन भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने बाळकृष्ण अवतार स्पर्धा घेण्यात आली़ स्पर्धेतील विजेत्यांना गुरूवारी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले़ भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमास सांस्कृतिक सेेलचे मराठवाडा पदाधिकारी गजानन जोशी, नगरसेेविका संध्या देठे, जिल्हा संघटन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, प्रज्ञासेलचे सहसंयोजक तुलजेश चौधरी, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़.
स्पर्धेत जालना जिल्ह्यातून 80 स्पर्धकांनी भाग घेतला होता़ त्यात प्रथम क्रमांक रेवा रामदासी, द्वितीय क्रमांक राघव देशपांडे, तृतीय क्रमांक सृजन जोशी, चतुर्थ क्रमांक मनस्वी गायकवाड हे विजेते ठरले़ विजेत्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले़ याप्रसंगी जिल्हाध्यक्षा देशपांडे यांनी स्पर्धेबद्दलची माहिती देऊन भारतीय संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला कळावा़ तसेच लहान मुलांमध्येही स्पर्धेबद्दल आकर्षण वाढावे म्हणून अशा स्पर्धांसोबतच इतर स्पर्धाही सेलच्या वतीने घेतल्या जातात़ कार्यक्रमास दीपा बिनीवाले, अपर्णा राजे, संपदा कुलकर्णी, मनीषा लाड, आनंदी अय्यर, जान्हवी वैद्य, अरुणा फुलमामडीकर, सुलभा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती़
Leave a Reply