जालना (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. अपघातही वाढत आहेत. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने 9 दिवस शहरातील विविध खड्डयांची पूजा करून गांधीगिरी आंदोलन करून नगर पालिकेचे लक्ष वेधण्यात आले.
खड्ड्यांमुळे हाताला डोक्याला, दुखापत, ही या खड्ड्यांमध्ये उभारून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आपले गार्हाणे सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रम्हदेव ह्याच्या कडे नेऊन मांडावे की काय हा यक्षप्रश्न समोर असल्याचे जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनी सांगितले. नगर पालिकेने सण-उत्सव पाहता शहरातील रस्त्यांची डागडुजी करावीअशी मागणी सेलच्यावतीने करण्यात आली. यापूर्वीही नगर पालिकेने दोन वेळेस निवेदन दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे, सुलभा कुलकर्णी, दीपा बिनीवाले, अरुणा फुलमामडीकर, संपदा कुलकर्णी,मनीषा लाड, लक्ष्मी वाघमारे,अपर्णा राजे, जान्हवी वैद्य, संध्या हांडे आदी महिला सदस्यांची उपस्थिती होती. खड्ड्यांची मलमपट्टी न करता ठोस पावले उचलवीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनी दिला आहे.
Leave a Reply