जालना (प्रतिनिधी):- जालना जिल्हयासह भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या तिन दिवसापासून पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील सर्वच पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून खरीपाचे व फळबागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्यास आर्थिक मदत देण्यास राज्यशासनाकडून हेतुपुरस्करपणे दिरंगाई होत असून तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत न दिल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी राज्यशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्हयासह भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून जास्तीच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयबीन, मका, तुर,मुग,उडीद,कपाशी,भुईमुग व फळबागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आज रोजी संकटात सापडला असतांना जिल्हयातील महसुली यंत्रणा कोणताही पंचनामा करतांना दिसत नाही. भाजपचे सरकार असतांनी शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात नुकसान भरपाई दिली जात होती परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार मध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना सध्या परिस्थीतीत शेतकरी अडचणीत असतांना कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठया प्रमाणात आर्थिक संकट कोसळले आहे. सध्या अति पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडू लागली असून हाती काहीही येण्यासारखे राहीलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यशासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सतोष पाटील दानवे यांनी दिला आहे.
Leave a Reply