जालना (प्रतिनिधी) ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ यांना न्यायालय आणि केंद्रातील सत्तेचा धमकीवजा इशारा देणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा महात्मा फुले समता परिषदेचे युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी तिव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात डॉ. धानुरे यांनी म्हटले आहे की, देशातील पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल काल रविवारी जाहिर होत असतांना ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनजी यांच्या बाजुने आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना सदर निवडणुकीच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रिये नंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना अनावश्यक पणे टार्गेट करत तुम्ही जामीनावर सुटला आहेत. असा प्रकारच्या धमकीवजा इशारा दिला होता. न्यायालय आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याचा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत चंद्रकांत पाटील आणि भुजबळ यांची तुलना होवू शकत नाही अशी टिपणी देखील या पत्रकात करण्यात आली आहे. भुजबळ यांनी राजकारण आणि समाजकारणात आज पर्यंत प्रभाविपणे काम करुन आपले स्वताचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे भुजबळ हे अशा वक्तव्याला कोणत्याही प्रकारचा थारा देत नाही असे डॉ. विशाल धानुरे यांनी पत्रकात नमुद केले आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना वेळीच आवर घालुन त्यांना समज द्यावी अशी अपेक्षा या पत्रकांत व्यक्त करण्यात आली आहे.
Leave a Reply