जालना (प्रतिनिधी) आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त जालन्यात होत असलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षण आंदोलनास भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचा पाठींबा राहणार असून या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. तारगे यांनी म्हटले आहे की, ओबींसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या केंद्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे ह्या आग्रही भूमिका मांडत असून जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आगामी निवडणूका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जालना येथे 26 जून रोजी ओबीसींचे चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले असून या आंदोलनास भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचा पाठींबा राहणार असून या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. तारगे यांनी केले आहे.
Leave a Reply