अच्युत मोरे
जालना : – जालना शहरात एका भाजपा पदाधिकार्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा एक विडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमतुन व्हायरल झाला असून पोलीस प्रशासना विरोधात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. खाकीतील गुंड म्हणून मारहणार करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मारहाण करणार्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी होणार असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
@CMOMaharashtra @AchutMore @PMOIndia जालना जिल्ह्यात भाजप कार्यकार्यतास पोलिसांची बेदम मारहाण; विडिओ व्हायरल, पोलिसांना बडतर्फ करण्यासाठी जनता आक्रमक. pic.twitter.com/25IUAw79UZ
— Lokshahinama News (@lokshahinama) May 27, 2021
अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा दिपक हॉस्पीटल जालना येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. त्यामुळे काही पदाधीकार्यांनी दिपक हॉस्पीटलची तोडफोड करुन धुडघुस घातला होता. या या प्रकरणी काही लोकांवर कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी गवळी समाजाबद्दल अपशब्द वापरुन शिवीगाळ केली होती. सदरील शुटींग शिवराज नारीयलवाला यांनी केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर खिरडकर यांना माहित झाले. त्यावेळी नारीयलवाले यांना रुग्णालयात बोलवून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर खिरडकर, पो.नि. प्रशांत महाजन यांच्यासह कर्मचार्यांनी साखळी करुन बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयानक होती की, जनावराला देखील काठ्या मारणार नाहीत इतके त्या युवकाला मारहाण करीत होते.
भाजपाचे पदाधीकारी शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दिपक हॉस्पिटलमध्ये काही पोलिसांनी साखळी करून लाथा-बुक्क्या, लाठीकाठीने जनावरसारखी मारहाण केली करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. एका असहाय्य व्यक्तीला अनेकांनी घेरुन मारहाण करणे म्हणजे मर्दांनगी नसल्याच्या तिखट प्रतिक्रिीया देखील अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. या निर्दयी आणि मारकुट्या पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचार्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या सदंर्भात भाजपच्या वरीष्ट पदाधीकार्यांनी देखील पोलीस अधिक्षक यांना दुरध्वनीवरुन मारहाण करणार्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर जालना जिल्ह्यात भिम शक्ती सामाजीक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे व गवळी समाजातील नेत्यांनी रोष व्यक्त करुन मारहाण करणार्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मारहाणीमध्ये शिवराज नारियलेवाले यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे जालन्यातील गवळी समाज संघटनेने वतीने आज घटनेच्या निषेधार्थ निवेदन अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
अप्पर पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत चौकशी सुरु – पो.अ. विनायक देशमुख
व्हायरल झालेल्या विडीओतील मारहाण करणार्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पो.नि. प्रशांत महाजन आणि मारहाण करणार्या पोलीस कर्मचार्यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून ही चौकशी अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांनी सांगीतले. या संदर्भात डी.जी. ऑफीसवरुन विचारणा करण्यात आली त्यांना चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात दोषी आढळून आलेल्या अधिकारी आणि पोलीस कर्मचाीर्यांवर कारवाई नक्की केली जाईल व तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयांना पाठविला जाईल असेही पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांनी दैनिक मराठवाडा केसरी सोबत बोलतांना सांगीतले.
Leave a Reply