जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे जालना विधानसभा विस्तारक योजनेत प्रचारक म्हणून काम केलेल्या व विद्यमान जालना शहर संघटन सरचिटणीस पदावर उत्तमरीत्या व प्रभावीपणे काम करणारे मयूर भगवानदास ठाकूर यांच्या जालना शहरातील संभाजीनगर निवास्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट घेऊन मयूर ठाकूर यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, शहराध्यक्ष राजेश राऊत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे, प्रदेश कार्य समिती सदस्य रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे यांची उपस्थिती होती.
भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.चंद्रकांत दादा पाटील हे जालना दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपा शहर संघटन सरचिटणीस मयूर ठाकूर यांच्या संभाजीनगर येथील निवास्थानी भेट दिली. या भेटी दरम्यान जालना शहरातील पक्ष संघटन बाबत आढावा घेतला तसेच ठाकूर कुटुंबियांची विचारपूस केली. मयूर ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत २०१५ पासून पूर्णवेळ जालना विधानसभा बुथ विस्तारक जबाबदारी ना.दानवे यांनी ठाकूर यांच्याकडे दिली होती ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली व त्यामुळेच मयूर ठाकूर यांना जालना शहरातील शहर संघटन सरचिटणीस पदी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे, जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी जबाबदारी दिली. भाजपाच्या जालना विस्तारक पदी उत्तमरीत्या व नियोजन करून जालना लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात बूथ विस्तारकचे काम उत्तमरीत्या केल्याबद्दल त्यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली.
यावेळी भाजपा पदाधिकारी वसंत शिंदे, भागवत बावणे, अतिक खान, नगरसेवक सुनील राठी, नगरसेवक चंपालाल भगत, धनराज काबलीये, महेंद्र अकोले, बाबासाहेब कोलते, रोषण चौधरी, रवी अग्रवाल, सुहास मुंडे, सुरेंद्र शेडूते, संदीप भोसले, संजय माधववाले, मनोज पाचफुले, अमोल कारंजेकर, सुनील कदम, अमित मानधने, पांडुरंग पोहेकर, रोहित नलावडे व जालना शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply