ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाजपा उरण तालुका महिला वतीने उरण आगारास निवेदन

September 9, 202122:45 PM 4 0 0

उरण ( संगिता पवार ) भाजपा उरण तालुका महिला अध्यक्षा अॅड .राणी सुरज म्हात्रे यांच्या वतीने उरण आगार प्रमुख सतीश मालचे यांना गुरुवार (दि .९ ) रोजी महिला कार्यकर्त्यासह निवेदन देण्यांत आले .


या निवेदनास असे नमूद केले आहे की ,उरण आगारात ज्या काही नवीन बसेस दाखल झाल्या आहेत .त्या बसेस मध्ये आसन व्यवस्था किती आहे .त्यामध्ये महिला व अपंगासाठी आरक्षित व्यवस्था आहे का असल्यास किती आसने आरक्षित आहेत ?तसेच आरक्षणाच्या पाट्या सीटला किंवा बस मध्ये लावल्या आहेत की नाही या संदर्भात संपूर्ण माहिती द्यावी असे नमूद केले आहे .
यावेळी भाजपा उरण तालुका महिला अध्यक्षा अॅड .राणी सुरज म्हात्रे ,उरण तालुका सरचिटणीस निर्मला प्रभाकर घरत ,भाजपा उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, जासई विभागीय अध्यक्ष विश्रांती घरत ,गोवठणे गावं अध्यक्ष विश्रांती म्हात्रे ,भाजपा पूर्व विभाग अध्यक्ष सुगंधा कोळी ,उरण आगार प्रमुख सतीश मालचे आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *